घरअर्थजगतQR CODE चा होतोय गैरवापर, सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी नक्की घ्या

QR CODE चा होतोय गैरवापर, सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी नक्की घ्या

Subscribe

आजकाल सगळ्याच ठिकाणी कॅशलेस व्यवहार करण्याकडे ओढा आहे. ज्यात पैशांच्या नोटा किंवा नाणी यांचा वापर न करता online payment appचा वापर करता येतो. आणि त्यासाठी मोबाईल नंबर किंवा क्यू - आर कोड (QR DODE) चा वापर मोठया प्रमाणात केला जात आहे.पण काही सायबर गुन्हेगार या क्यू - आय कोड मध्ये बदल करून त्याचा गैरफायदा घेतात.

आजकाल आपण काहीही खरेदी केले की दुकानदाराला सहज विचारतो गुगल पे किंवा पे टीएम आहे का? हल्ली एखादा भाजीवाला जरी असला तरी त्याच्याकडे ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन (online payment option) उपलब्ध असतो. आजकाल सगळ्याच ठिकाणी कॅशलेस व्यवहार करण्याकडे ओढा आहे. ज्यात पैशांच्या नोटा किंवा नाणी यांचा वापर न करता online payment app चा वापर करता येतो. त्यासाठी मोबाईल नंबर किंवा क्यू – आर कोड (QR DODE) चा वापर मोठया प्रमाणात केला जात आहे. online payment मुळे पैसे जरी खिशात ठेवण्याची गरज नसली तरीही online payment च्या क्यू – आर कोड चा वापर करणं हे केव्हा केव्हा धोकादायक सुद्धा ठरू शकतं आणि त्यामुळे पैशांचे व्यवहार करताना तुमची फसवणूक सुद्धा होऊ शकते.

नेमका हा क्यू – आर कोड काय आहे ? आणि तो का वापरला जातो ? हे जाणून घेऊ

- Advertisement -

क्यू – आर चे विस्तृत रूप क्विक रिस्पॉन्स असे आहे. हा क्यू – आर कोड (QR DODE) सर्वांत आधी एका जपानी ऑटोमोबाईल डेंसो वेअर या कंपनीने १९९४ साली तयार केला होता. या क्यू – आर कोडला मशीनच्या माध्यमातून वाचता येऊ शकते म्हणजेच स्कॅन करता येऊ शकते. त्याचबरोबर या कोडमध्ये महत्वाची माहितीसुद्धा असते. जेव्हा हा क्यू – आर कोड स्कॅन केला जातो म्हणजेच मशीनच्या साहाय्याने वाचला जातो तेव्हा त्यामध्ये असलेली सर्व माहिती समोर येते. त्याचबरोबर या क्यू – आर कोडचा (QR DODE) वापर हा कोणत्याही वस्तूची ओळख पटविण्यासाठी किंवा ट्रॅकिंग करण्यासाठी सुद्धा केला जातो. किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीची अधिक माहिती मिळवून देण्यासाठी संबंधित वेब साईटकडे सुद्धा या क्यू – आर कोडच्या मदतीने जाता येते. याचं उदाहरण द्यायचं झालं तर, जर एखाद्या वाहनावर (कार) असलेला क्यू – आर कोड स्कॅन केला तर त्या कार संदर्भात सगळी माहिती दिसू शकते. त्या कारची रचना कशी आहे, ती केव्हा तयार करण्यात आली आहे. ती कार जेव्हा तयार केली गेली तेव्हा तिची एकूण प्रक्रिया काय होती. एवढंच नव्हे तर हा स्कॅन केलेला क्यू – आर कोड त्या कार च्या वेबसाईटपर्यंत सुद्धा तुम्हाला घेऊन जाऊ शकतो.
या क्यू – आर कोडचा कार इंडस्ट्रीमध्ये वापर केला जातो त्याचप्रमाणे याचा वापर विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये केला जात आहे.  क्यू – आर कोड (QR DODE) वापरण्यासाठी सुद्धा अगदी सोपा आहे. त्याचप्रमाणे यामध्ये यूपीसी बार कोडच्या मदतीने जास्तीत जास्त माहिती स्टोर केली जाऊ शकते.

क्यू – आर कोडने पैशांचे व्यवहार कसे केले जातात?

- Advertisement -

क्यू – आर कोडमध्ये तुम्ही तुमच्या बँक अकाऊंट आणि क्रेडिट कार्डची सगळी माहिती टाकू शकता. जेव्हा आपल्याला कुणाला पैसे पाठवायचे असतात. तेव्हा आपण समोरच्याचा नंबर घेऊन तो आपल्या अकाऊंटशी जोडतो आणि नंतर पैसे पाठवतो. पण जर का आपल्याकडे त्या अकाऊंटचा क्यू – आर कोड असेल तर तो स्कॅन करून त्याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळू शकते आणि पैसे सुद्धा पाठवू शकतो. जे कुणी छोटे व्यापारी आहेत त्यांच्या दृष्टीने क्यू -आर कोड हा जास्त फायदेशीर आणि वापरण्यास सहज सोपा आहे. त्यामुळे पैशांचे व्यवहार होपे होतात. क्यू – आर कोडचा वापर या अश्या छोट्या व्यापाऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात केला जात आहे.

क्यू – आर कोडने पेमेंट करताना येणाऱ्या अडचणी –

क्यू – आर कोडच्या माध्यमातून पेमेंट करणे सोपे झाले असले तरीही यामुळे मोठ्या प्रमाणावर सायबर क्राईम वाढले आहेत. जेव्हा तुमच्या बँक अकाउंटमध्ये एखादी रक्कम जमा होणार असते तेव्हा तुम्हाला कोणताही ओटीपी देण्याची गरज नसते. पण जर का तुम्हाला कुणाला पैसे द्यायचे असतात तेव्हा मात्र तुमच्या फोनवर येणारा ओटीपी हा व्हेरिफाय करावा लागतो. तसेच जेव्हा तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे येणार असतात तेव्हाही तुम्हाला कोणताही क्यू – आर कोड स्कॅन करण्याची गरज नसते. पण पैसे पाठवते वेळी कोड स्कॅन करण्याची गरज असते. ही पद्धत ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी फायदेशीर ठरते. पण काही सायबर गुन्हेगार या क्यू – आय कोडमध्ये बदल करून त्याचा गैरफायदा घेतात. ते सहजरित्या हाती सुद्धा लागत नाही.  त्या माध्यमातून ते दुसरे अकाऊंट सुरु करून त्याद्वारे इतरांची फसवणूक सुद्धा करतात.

कोणती काळजी घेणे आवश्यक आहे-

१) तुम्ही कुणाला पैसे पाठवणार असाल तर समोरच्या व्यक्तीने त्याची दिलेली माहिती असते ती तुम्ही तपासून पाहणे अत्यंत गरजेचे आहे. त्या माहितीची खात्री झाल्यानंतरच पैसे पाठवा.
२) तुमच्या बँक अकाऊंटमधूनमधून पैसे कट झाल्यानंतर ते समोरच्यापर्यंत पोहोचले आहते की नाही हे सुद्धा तपासून घ्या.
३) जर तुमच्या बँक अकाऊंटमधून पैसे कट झाले आणि ते समोरच्या पर्यंत पोहचले नाही तर तुमच्या बँकेशी त्वरित संपर्क साधा, त्याने नुकसान कमी होण्याची शक्याता असते.
४) ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुम्ही जो APP वापरता त्याला आधी कुणी आणि किती रेटिंग दिले आहे, त्याचबरोबर त्याला कशा प्रतिक्रिया मिळाल्या आहेत ते सुद्धा बघणे गरजेचे आहे ते नक्की तपासून घ्या
५) फक्त क्यू – आर कोड साठीच नाही तर ऑनलाईन स्वरूपाचे कोणतेही पैशांचे व्यवहार करताना आवश्यक असलेली सावधगिरी नक्की बगळा

कोणतही नवीन तंत्रज्ञान आणि apps हे ग्राहकांच्या सुविधेसाठी आणि वेळेची बचत होण्यासाठी केले जातात. पण तंत्रज्ञान जितके पुढारले आहे तितकाच त्याचा दुरुपयोग सुद्धा वाढलेला आहे. पण तुम्ही पैशांचे ऑनलाईन व्यवहार करताना जर का योग्य ती काळजी घेतली तर तुमचं नुकसान होणार नाही.

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -