नव्या वर्षात एलपीजी सिलिंडर महागला, व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्या

यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी केली होती. दुसरीकडे जर आपल्याला घरगुती गॅस सिलिंडरबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या किमती समान आहेत

Ujjwala scheme rs 200 subsidy per cylinder to be extended
उज्ज्वला योजनेचा कालावधी आणखी एका वर्षाने वाढवण्यात आला आहे.

नवी दिल्लीः गॅस वितरण कंपन्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी (1 जानेवारी 2023) देशभरात एलपीजीच्या किमती वाढवल्या आहेत. आजपासून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, दिलासा देणारी बातमी म्हणजे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याचा अर्थ घरगुती वापरासाठी एलपीजी सिलिंडर त्यांच्या जुन्या किमतीतच उपलब्ध असतील.

यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी केली होती. दुसरीकडे जर आपल्याला घरगुती गॅस सिलिंडरबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या किमती समान आहेत. 6 जुलै 2022 ला 14.2 किलो घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल झाला होता, तेव्हा त्याच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली.

शहरातील व्यावसायिक सिलिंडर दर

दिल्ली 1769 रुपये
कोलकाता 1870 रुपये
मुंबई 1721 रुपये
चेन्नई 1917 रुपये

शहरातील घरगुती सिलिंडरचे दर

दिल्ली 1053 रुपये
मुंबई 1052.5 रुपये
कोलकाता 1079 रुपये
चेन्नई 1068.5 रुपये

याशिवाय पाटण्यात 14.2 किलोचा घरगुती सिलिंडर 1151 रुपये, शिमल्यात 14.2 किलोचा घरगुती सिलिंडर 1097.50 रुपये, इंदूरमध्ये 14.2 किलोचा घरगुती सिलिंडर 1081 रुपये, अहमदाबादमध्ये 14.2 किलोचा घरगुती सिलिंडर 1060 रुपये, भोपाळमध्ये 14.2 किलोचा घरगुती सिलिंडर 1058.50 रुपये, जयपूरमध्ये 14.2 किलोचा घरगुती सिलिंडर 1056.50 रुपये आणि बंगळुरूमध्ये 14.2 किलोचा घरगुती सिलिंडर 1055.50 रुपयांना मिळत आहे. विशेष म्हणजे 2022 मध्ये 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत सुमारे 154 रुपयांनी वाढली होती. याउलट 19 किलोचा सिलिंडर 357 रुपयांनी स्वस्त झाला होता. यादरम्यान, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर एकूण 18 वेळा बदलण्यात आलेत. यामध्ये सिलिंडर 12 पट स्वस्त आणि फक्त 6 पट महाग झालाय.

2022 मध्ये 14.2 किलोच्या LPG सिलिंडरच्या दरात बदल

विशेष म्हणजे 6 ऑक्टोबर 2021 घरगुती सिलिंडरची किंमत 899.50 रुपये होती. तर 22 मार्च 2022 ला ती 949.50 रुपये 50 ने वाढली, 7 मे 2022 रोजी 20 रुपयांनी वाढून ती 999.50 रुपये झाली. 19 मे 2022 ला 3.50 रुपयांनी वाढून सिलिंडर 1003 रुपये झाला. तर 6 जुलै 2022 सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढून 1053 रुपये झाली.


हेही वाचाः Government Jobs 2023 : नव्या वर्षात 30 हजार नोकऱ्यांची भेट, कुठे आहे भरती?