Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर अर्थजगत पेन्शन धारकांनो, बँकेतून दर महिन्याला मिळेल Pension Slip,तर WhatsApp वर मिळेल खात्यातील...

पेन्शन धारकांनो, बँकेतून दर महिन्याला मिळेल Pension Slip,तर WhatsApp वर मिळेल खात्यातील जमा रक्कम

Related Story

- Advertisement -

पेन्शन धारकांना आता Pension Slip साठी सतत बँकेत जाण्याची गरज लागणार नाही. कारण केंद्र सरकारने पेन्शन देणाऱ्या बँकांना Pension Slip देण्यासंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. यापूर्वी  कर्मचाऱ्यांना पेन्शन देताना बँका पेन्शन संदर्भातील नियमांचे पालन करत नव्हत्या. तर अनेकदा Pension बँक खात्यात जमा झाल्यानंतरही Pension Slip दिली जात नव्हती. तर काही बँका Pension Slip देतात मात्र त्यात अपूरी माहिती देतात. ज्यामुळे Pensioner ला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

आता WhatsApp वर मिळणार पेन्शनची माहिती

आता पेन्शन धारकांना त्यांची Pension Slip मोबाईल नंबरवर SMS किंवा Email द्वारे मिळवता येणार आहे. केंद्र सरकारच्या पर्सनल डिपार्टमेंटने (Ministry of Personnel, Public Grievances and Pensions) पेन्शन जारी करणाऱ्या बँकांना सांगितलं, की ते पेन्शनधारकांना पेन्शन स्लिप त्यांच्या मोबाईल नंबरवर SMS किंवा Email द्वारे पाठवू शकतात. बँका यासाठी पेन्शनधारकांचा रजिस्टर्ड मोबाईल नंबरचा वापर करू शकतात,

पेन्शन स्लिप देण्यात दिरंगाई

- Advertisement -

डिपार्टमेंट ऑफ एक्‍सपेंडिचरचे Sr. AO सतीश कुमार गर्ग यांच्या मते, केंद्राच्या आदेशानंतरही Pension Disbursing Banks पेन्शन स्लिप देण्यात दिरंगाई करतात. मात्र केंद्राच्या नव्या आदेशानुसार, Pension बँक खात्यात क्रेडिट होताच Pension Slip ही Pensioner च्या रजिस्टर मोबाईल नंबरवर SMS किंवा Email द्वारे पाठवावी लागेल. याशिवाय WhatsApp सारख्या Social Media प्लॅटफॉर्मचा देखील वापर करु शकतात.

बँकेतून दर महिन्याला मिळेल Pension Slip

सरकारच्या आदेशानुसार, Pension Slip मध्ये मासिक पेन्शनचे संपूर्ण डिटेल्स असावेत. जर टॅक्ससंबंधी काही कपात असेल, तर ती माहितीदेखील स्लिपमध्ये असावी. तसंच किती रक्कम पेन्शन अकाउंट देण्यात आली, हेदेखील Pension Slip मध्ये असावं, असंही सांगण्यात आलं आहे.

कशी असेल Pension Slip

- Advertisement -

बँकांना दोन कॉलममध्ये Pension Slip जारी करावी लागेल. यातील पहिल्या कॉलमध्ये एका महिन्यात पेन्शनची किती रक्कम खात्यात जमा झाली आणि दुसऱ्या कॉलमध्ये किती पेन्शन स्लीप जाहीर झाल्याच याची माहिती द्यावी लागेल. हा फॉरमॅट पेन्शन चीफ कंट्रोलर यांनी सुचवला आहे.


 

- Advertisement -