घरअर्थजगतआता क्रेडिट कार्डही यूपीआयला लिंक होणार, आरबीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय

आता क्रेडिट कार्डही यूपीआयला लिंक होणार, आरबीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय

Subscribe

पेटीएमपासून (Paytm) फोनपे (Phonepay) पर्यंत सर्वच अॅपची या काळात चांगली कमाई झाली. आता तर बहुतेक सर्व व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून केले जातात. लहान-मोठ्या व्यवसायिकांपासून वैयक्तिक कारणासाठी यूपीआयचा वापर वाढला आहे.

क्रेडिट कार्डधारकांसाठी (Credit Card Users) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) क्रेडिट कार्ड युपीआयला (UPI) जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. हा निर्णय अंमलात आणल्यानंतर देशातील कोट्यवधी क्रेडिट कार्ड धारकांना मोठा फायदा होणार आहे. (Now credit cards will also be linked to UPI, a big decision of RBI)

हेही वाचा – RBI चा मोठा निर्णय, को ऑपरेटिव्ह बँकांना होम लोनसाठी 1.40 कोटींची मर्यादा

- Advertisement -

देशात नोटाबंदी (Denomination) झाल्यानंतर ऑनलाईन व्यवहारात (Online Transactoin) मोठ्या प्रमाणात वाढ झाली. फायनान्स क्षेत्रातील अॅप्सने याचा पुरेपूर वापर करून घेतला. पेटीएमपासून (Paytm) फोनपे (Phonepay) पर्यंत सर्वच अॅपची या काळात चांगली कमाई झाली. आता तर बहुतेक सर्व व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून केले जातात. लहान-मोठ्या व्यवसायिकांपासून वैयक्तिक कारणासाठी यूपीआयचा वापर वाढला आहे. त्यामुळे आरबीआयने ग्राहकांसाठी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोट्यवधी ग्राहक त्यांच्या खात्याव्यतिरिक्त क्रेडिट कार्डद्वारेही पेमेंट करू शकणार आहेत.

हेही वाचा – RBI Repo Rate Hike : EMI अधिक महाग होणार, रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ

- Advertisement -

गेल्या काही काळात यूपीआयसोबतच क्रेडिट कार्डधारकांची संख्याही वाढली आहे. आकर्षक ऑफर्स उपलब्ध असल्याने अनेकजण क्रेडिट कार्डचा सर्रास वापर करतात. मात्र, यूपीआय व्यवहार करताना क्रेडिट कार्डचा उपयोग होत नसल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यूपीआयला क्रेडिट कार्ड जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

या नव्या प्रणालीची सुरुवात रुपे क्रेडिट कार्डपासून होणार आहे. तसेच, मेस्ट्रो, व्हिजा क्रेडिट कार्डसारख्या कार्डसाठी ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. हा अत्यंत चांगला आणि फायदेशीर निर्णय असल्याने फिनटेक आणि बँकींग कंपन्यांचे शेअर्सही वधारले आहेत.

हेही वाचा -EPF Interest Rate: व्याजदर कपातीला सरकारची मंजुरी, 8.1 टक्के व्याज मिळणार

दरम्यान, खिशात पैसे नसतानाही खर्च करण्याची सवय असणाऱ्यांसाठी हा चांगला निर्णय आहे. मात्र, खर्चाचे व्यवस्थित नियोजन न केल्यास डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे.

यूपीआयचे – क्रेडिट कार्ड लिंक झाल्यास फायदा काय?

  • सध्या भारतात २६ कोटी यूपीआय वापरकर्ते आहेत. तर, ५ कोटी व्यापारीही यूपीआयला जोडले गेले आहेत. यांच्याकडून १० लाख कोटींहून अधिक व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून केले जातात.
  • मे महिन्याची आकडेवारी पाहिल्यास ५९४.६३ कोटी व्यवहार यूपीआयद्वारे करण्यात आले. यामाध्यमातून १०.४०लाख कोटींचे व्यवहार झाले, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.
  • अत्यंत सहज आणि सोपी पद्धत असल्याने आरबीआय यूपीआयद्वारे व्यवहार वाढवण्यावर भर देत आहे.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -