घरअर्थजगतWomen's Day 2022: महिला दिनी पत्नीच्या नावे उघडा स्पेशल अकाऊंट अन् दर...

Women’s Day 2022: महिला दिनी पत्नीच्या नावे उघडा स्पेशल अकाऊंट अन् दर महिना मिळवा 44,793 रुपये; जाणून घ्या कसे

Subscribe

8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने पुरुष मंडळींना असे वाटत असेल की, आपल्या पत्नीला एखादी खास भेटवस्तू द्यावी आणि ती त्यामुळे स्वावलंबी होईल तर यासाठी ही संपूर्ण बातमी नक्की वाचा. जर भविष्यात तुम्हाला तुमची पत्नी कोणावरही अवलंबून राहायला नको असे वाटत असेल, तर तिच्यासाठी रेग्युलर इन्कमची व्यवस्था करू शकता. यासाठी तुम्हाला National Pension Schemeमध्ये गुंतवणूक करावी लागले. जाणून या योजनेबाबत…

पत्नीच्या नावे उघडा न्यू पेन्शन सिस्टमचे खाते

तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर न्यू पेंशन सिस्टमचे (NPS) अकाऊंट उघडू शकता. NPS अकाऊंट उघडल्यानंतर तुमच्या पत्नीला वयाच्या 60 वर्ष पूर्ण झाल्यावर एकरकमी रक्कम देईल. शिवाय दर महिन्याला त्यांना पेन्शनच्या रुपात रेग्युलर इन्कमही देईल. एवढेच नाही तर NPS अकाऊंटसोबत तुम्ही असे ही निश्चित करू शकता की, पत्नीला दर महिन्याला किती पेन्शन मिळेल. यामुळे तुमची पत्नी ६० वर्षानंतर पैशांसाठी कोणावरही अवलंबून राहणार नाही.

- Advertisement -

गुंतवणूक करणे सोपे

तुम्ही न्यू पेन्शन सिस्टमच्या अकाऊंटमध्ये आपल्या सुविधेनुसार दर महिन्याला किंवा वर्षाला पैसे जमा करू शकता. तुम्ही फक्त 1 हजार रुपयांनी पत्नीच्या नावे NPS अकाऊंट उघडू शकता. वयाच्या 60व्या वर्षी NPS अकाऊंट मॅच्योर होते. नव्या नियमांच्या अंतर्गत तुम्ही पाहिजे तर पत्नीचे वय 65 वर्ष होईपर्यंत NPS अकाऊंट सुरू करू शकता.

45 हजारापर्यंत मासिक इन्कम

जर तुमच्या पत्नीचे वय ३० वर्ष आहे आणि तुम्ही पत्नीच्या एनपीएस अकाऊंटमध्ये दर महिन्यांला ५ हजार रुपये गुंतवणूक करत आहात. तर त्या गुंतवणुकीवर वर्षाला १० टक्के रिटर्न मिळतो. त्यामुळे पत्नीच्या वयाच्या ६०व्या वर्षी अकाऊंटमध्ये एकूण 1.12 कोटी रुपये येतील. यामध्ये जवळपास ४५ लाख रुपये त्यांना मिळतील. याशिवाय पत्नीला दर महिन्याला ४५ हजार रुपये पेन्शन मिळू लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही पेन्शन आयुष्यभर मिळेल.

- Advertisement -

एकरकमी रक्कम आणि पेन्शन किती मिळेल?

वय – 30 वर्ष
गुंतवणूक करण्याची एकूण कालावधी – 30 वर्ष
महिन्याला गुंतवणूक – 5 हजार रुपये
गुंतवणुकीवर रिटर्न – 10 टक्के
एकूण पेन्शन फंड – 1,11,98,471 रुपये (मॅच्योरिटीवर काढू शकतो रक्कम)
एन्युटी प्लॅन खरेदी करण्यासाठी रक्कम – 44,79,388 रुपये
एन्युटी रेट ८ टक्के – 67,19,083 रुपये
महिन्याला पेन्शन – 44,793 रुपये


हेही वाचा – जागतिक महिला दिन ८ मार्चलाच साजरा का केला जातो? यावर्षीची ही आहे ‘थीम’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -