Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर अर्थजगत शेअर मार्केटमध्ये तांत्रिक बिघाड; निफ्टीचे सर्व व्यवहार ठप्प

शेअर मार्केटमध्ये तांत्रिक बिघाड; निफ्टीचे सर्व व्यवहार ठप्प

Related Story

- Advertisement -

भारतीय शेअर बाजाराच्या तांत्रिक बिघाडामुळे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) वर मोठा परिणाम झाला. बुधवारी शेअर मार्केटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. एनएसईच्या निर्देशांक फीडमध्ये अनेक अडचणी देखील आल्याचे सांगितले जात आहे. अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, सर्व विभागाचे काम ११ वाजून ४० मिनिटांनी बंद करण्यात आले आहे. झालेला तांत्रिक बिघाड आणि ही सर्व यंत्रणा लवकरात लवकर रुळावर येण्याचे प्रयत्न सुरू आहे. हा तांत्रिक बिघाड सुधारताच या सर्व समस्येचे निराकरण होईल आणि भारतीय शेअर पुनर्संचयित केले जाईल, असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

अधिकृत निवेदनात असेही म्हटले आहे की, ‘एनएसईकडे रेडुएन्सीची खात्री करण्यासाठी एनएसईच्या दोन सर्विस प्रोव्हायडरशी अनेक टेलिकॉम लिंक आहेत. आम्ही दोन्ही टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांशी या झालेल्या बिघाडासंदर्भात चर्चा करत आहोत. की त्यांच्या लिंकमध्ये कोणत्या अडचणी आल्या आहेत का? की ज्यामुळे एनएसईच्या संपूर्ण प्रणालीवर त्याच्या परिणाम होत आहे.’

सेन्सेक्समध्ये असणाऱ्या शेअर्समध्ये अॅक्सिस बँक जवळपास दोन टक्क्यांनी वाढीसह तेजीत होते. यासह बजाज फायनान्स, स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी आणि अल्ट्रा टेक सिमेंटच्या शेअर्समध्येही नफा झाल्याची नोंद करण्यात आली. तर टीसीएस, पॉवर ग्रिड, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

असेही सांगितले जात आहे की, स्थानिक जागतिक बाजारपेठेत बुधवारी संमिश्र वाढीची नोंद झाली. निफ्टी ५० पुन्हा एकदा १४ हजार ७५० पार करण्यास यशस्वी झाला. बुधवारी सकाळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १२३ अंकांच्या म्हणजेच ०.२५ टक्क्यांच्या वाढीसह ४९,८७४.७२ वर ट्रेड करताना दिसला. तर निफ्टीदेखील ३६ अंक म्हणजेच ०.२४ टक्क्यांच्या वाढीसह १४,७४३.८० अंकांच्या वाढीसह ट्रेड करीत आहे. सुरुवातीच्या व्यापारात ९३१ शेअर्सची वाढ झाली, तर २७२ शेअर्सची घसरण झाली. ४६ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. मार्चपासून गेलच्या टाटा ग्राहक उत्पादनांचा निफ्टी ५० निर्देशांकात समावेश होणार आहे. या बातमीनंतर गेल इंडियाचा शेअर बीएसई वर १.५६ टक्क्यांनी खाली आला आणि १४५.०५ रुपयांवर ट्रेड झाला.

- Advertisement -