घरअर्थजगतएटीएममधून १० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी द्यावा लागणार ओटीपी

एटीएममधून १० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी द्यावा लागणार ओटीपी

Subscribe

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशांनंतर आता एटीएमचे फ्रॉड थांबवण्यासाठी बँकांनी विविध पावले उचलायला सुरुवात केली आहे. कॅनरा बँकेने एटीएममधून कार्डद्वारे १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढताना ग्राहकांना ओटीपी बंधनकारक केला आहे. म्हणजेच एटीएममधून तुम्हाला दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम काढायची असेल तर पासवर्डसोबत ओटीपी क्रमांकही द्यावा लागेल.

आता अन्य बँकादेखील कॅनरा बँकेप्रमाणेच हा ओटीपीचा नियम करण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, आरबीआयच्या निर्देशांचे सर्व बँकांना पालन करायचे आहे. एटीएमद्वारे होणारी फसवणूक रोखायला हवी. एटीएम फसवणुकीचे प्रकार रात्री ११ पासून सकाळी ६ वाजेपर्यंत सर्वाधिक होतात.

- Advertisement -

२०१८-१९ मध्ये दिल्लीत १७९ एटीएम फसवणुकीचे गुन्ही दाखल झाले. महाराष्ट्रात या दरम्यान २३३ गुन्हे दाखल झाले. अलीकडेच कार्डच्या क्लोनिंगचे प्रकारही समोर आहे. २०१८-१९ मध्ये देशभरात एटीएम फसवणुकीचे ९८० प्रकार घडले आहेत. त्याआधीच्या वर्षी ही संख्या ९११ होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -