घरअर्थजगतआता आधार कार्डवरून मिळणार कर्ज, एसबीआयसह या बँका देत आहेत सुविधा, जाणून...

आता आधार कार्डवरून मिळणार कर्ज, एसबीआयसह या बँका देत आहेत सुविधा, जाणून घ्या काय आहे योजना?

Subscribe

तुम्ही आधार कार्डद्वारे वैयक्तिक कर्जासाठी (personal loan) अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि तेथे जाऊन तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता.

तुमचाही कर्ज (loan) घेण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही आधार कार्डद्वारेही (Aadhar card) कर्ज घेऊ शकता. आजच्या काळात घरातील गॅस सिलिंडरपासून (gas cylinders) ते बँकेच्या कामापर्यंत सर्वत्र आधारचा वापर केला जातो. परंतु आता तुम्ही आधार कार्डच्या मदतीने कर्ज देखील घेऊ शकता.

या बँका देतील कर्ज
तुम्ही आधार कार्डद्वारे वैयक्तिक कर्जासाठी (personal loan) अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि तेथे जाऊन तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) आणि एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank ) ग्राहक आधार कार्डच्या आधारे कर्ज घेऊ शकतात.

- Advertisement -

क्रेडिट स्कोअर किती असावा
कर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर ( credit score).  कर्ज घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर 750 पेक्षा जास्त असावा. त्यानंतरच तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. 750 पेक्षा कमी क्रेडिट स्कोअर असाल तर तुम्हाला कर्ज मिळणार नाही. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर बँक तुम्हाला कमी व्याजदरावर कर्जाची सुविधा देखील देते.

कर्जासाठी अर्ज कसा करता येईल?

  • सर्वप्रथम तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  •  याशिवाय तुम्ही बँकेच्या मोबाईल अॅपद्वारेही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता.
  • यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
  • तुम्हाला मोबाईल नंबरवर मिळालेला OTP टाकावा लागेल.
  • आता तुम्हाला वैयक्तिक कर्जाचा पर्याय निवडावा लागेल.
  • यानंतर जन्मतारीख आणि पत्त्यासह सर्व तपशील भरा.
  • आता तुम्हाला कर्जाची रक्कम टाकावी लागेल.
  •  तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड आणि सर्व आवश्यक कागदपत्रांचा तपशील द्यावा लागेल.
  • तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर तुमचे कर्ज मंजूर होईल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -