घरअर्थजगतपेट्रोल, डिझेल झाले स्वस्त

पेट्रोल, डिझेल झाले स्वस्त

Subscribe

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढतायत, पण घरगुती बाजारात मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट होतेय. आज गुरुवारी ( 25 जुलै ) 12 दिवसांनंतर डिझेल स्वस्त झालंय. त्याबरोबर पेट्रोलच्या किमतीतही एका दिवसानंतर घट झालीय. आज सकाळी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलमध्ये 6 पैसे प्रति लिटर घसरण झाली. मुंबईत पेट्रोल 6 पैसे तर डिझेल 7 पैशांनी स्वस्त झाले आहे.

मध्य पूर्वेत असलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वद्धी पाहायला मिळाली. आखाती देशातल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी कच्च्या तेलाच्या किमती जास्त वाढल्या. त्यामुळे लवकरच या किमती वाढू शकतात.इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आज दिल्ली, कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नई इथे पेट्रोलचे दर क्रमश: 73.35 रुपये, 75.85 रुपये, 78.96 रुपये और 76.19 रुपये प्रति लीटर आहेत. चार महानगरांमध्ये डिझेलचे दर क्रमश: 66.18 रुपये, 68.29 रुपये, 69.37 रुपये आणि 69.91 रुपये प्रति लीटर आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -