घरअर्थजगतJio मध्ये ११ वी गुंतवणूक! सौदी अरेबियाच्या PIF ने केली ११,३६७ कोटींची...

Jio मध्ये ११ वी गुंतवणूक! सौदी अरेबियाच्या PIF ने केली ११,३६७ कोटींची गुंतवणूक

Subscribe

सौदी अरेबियाची PIF खरेदी करणार २.३२% भाग भांडवल

जिओमध्ये गुंतवणूकदार आकर्षित होत आहे. गुरुवारी मुकेश अंबानी यांच्या कंपनीला अकरावा गुंतवणूकदार मिळाला. आता पीआयएफ (पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड) गुंतवणूकीने जिओ प्लॅटफॉर्मवर तब्बल ११ हजार ३६७ कोटींची गुंतवणूक केली आहे. कंपनीत त्याची २.३२ टक्के भागीदारी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने (RIL) गुरुवारी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ११ वी गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

सौदी अरेबियाची PIF खरेदी करणार २.३२% भाग भांडवल

दरम्यान, गेल्या ९ आठवड्यांत सलग १० गुंतवणुकदारांनंतर आता सौदी अरेबिया सॉवरेन वेल्थ फंड पीआयएफ २.३२ टक्के भागभांडवलसाठी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ११ हजार ३६७ कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. २२ एप्रिलनंतर जिओ प्लॅटफॉर्ममधील ही ११ वी गुंतवणूक आहे. यासह रिलायन्स इंडस्ट्रीजच्या या युनिटने गेल्या ९ आठवड्यांत जागतिक गुंतवणुकदारांना २४.७ टक्के हिस्सा विकून १.१५ लाख कोटी रुपये मिळवले आहेत.

- Advertisement -

सर्वात मोठ्या गुंतवणुकदारांचा समावेश

तसेच, पीआयएफने जिओचे इक्विटी मूल्यांकन ४.९१ लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइझचे मूल्यांकन ५.१६ लाख कोटी रुपयांचा अनुमान लावला आहे. तर खासगी इक्विटी कंपन्या एल कॅटरटन आणि टीपीजीने जिओमध्ये गुंतवणूक जाहीर केली आहे. साधारण आतापर्यंत जिओ प्लॅटफॉर्ममध्ये २४.७ टक्के हिस्सेदारीच्या तुलनेत एकूण १ लाख १५ हजार ६९३.९५ कोटी रुपये आले आहेत. जिओमध्ये गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांच्या यादीमध्ये जगभरातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या सर्वात मोठ्या गुंतवणुकदारांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

फेसबुकपासून गुंतवणूक सुरू झाली

२२ एप्रिल रोजी सोशल मीडिया कंपनी फेसबुकने ९.९९ टक्के भागभांडवलसाठी  ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली होती. ही मोठ्या स्तरावरील चांगली सुरुवात आहे. फेसबुकनंतर सिल्व्हर लेक, व्हिस्टा इक्विटी, जनरल अटलांटिक, केकेआर, मुबाडला इन्व्हेस्टमेंट, सिल्व्हर लेक, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट, टीपीजी इन्व्हेस्टमेंट, एल कॅटरटन आणि आता पीआय इन्व्हेस्टमेंटचा क्रमांक लागतो.


रेल्वेचा मोठा निर्णयः २०१६ साली चिनी कंपनीसह केलेला ४७१ कोटी रुपयांचा करार रेल्वेने केला रद्द!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -