घरअर्थजगतदर महिना एक रुपया भरा आणि लखपती व्हा

दर महिना एक रुपया भरा आणि लखपती व्हा

Subscribe

केंद्र सरकारने देशातील गरीब कुटुंबांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या गरीब कुटुंबाना आता पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या (PMSBY) अंतर्गत दर महिना एक रुपया भरून तब्बल दोन लाख रुपयांचे विम्याचे सुरक्षा कवच दिले जाणार आहे. त्यामुळे दर महिना एक रुपया भरुन गरीब कुटुंबाना लाख रुपयांच्या विमाच्या फायदा घेता येणार आहे.

आजच्या धावपळीच्या जगाच स्वत:च्या सुरक्षेसाठी विमा एक गुंतवणूक नाही तर अत्यंत आवश्यक बाब बनली आहे. यामुळे आपल्य़ासह कुंटुंबाचे सामाजिक संरक्षण करत येते. उच्च मध्यम वर्गातील बहुतेक जण विमा उतरवतात. मात्र गरीब नागरिकांना विम्याचे प्रिमियम भरणे परवडत नसल्याने त्यांना सुरक्षा विम्यापासून दूर राहावे लागते. याच गरीब कुटुंबांच्या सामाजिक सुरक्षेसाठी आता केंद्र सरकारने ही योजना सुरु केली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाने वर्षाला १२ रुपये भरावे भरल्यास त्यांना दोन लाखांपर्यंत अपघात विमा सुरक्षा मिळणार आहे. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वर्षात एकदाच तुम्हाला १२ रुपयांचा प्रिमियम भरायचा असून तो तुमच्या बँक अकाऊंटमधून आपोआप कट होईल.

या योजनसाठी रजिस्ट्रेशन केल्यास दर वर्षी ३१ मेपूर्वी तुमच्या अकाऊंटमधून १२ रुपये कट होतील. यामुळे तुम्हाला १ जून ते ३१ मे या कालावधीदरम्यान विम्याचे सुरक्षा मिळणार आहे. या योजनेनुसार, संबंधीत व्यक्तीचा अपघात झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांचा अपघाती विमा मिळेल. तर जखमी झाल्यास किंवा तात्पुरते अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांचा विमा मिळेल. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक अकाऊंटमध्ये पैसे असणे आवश्यक आहे. कारण बँक खाते बंद झाल्यास तुमची विमा पॉलिसी बंद होईल.

- Advertisement -

योजनेसाठी कसे कराल रजिस्ट्रेशन?

जवळच्या बँकेत जाऊन या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज करता येईल. यासाठी तुम्ही बँक मित्रांची मदत घेऊ शकता. केंद्र सरकारद्वारे सर्व सरकारी आणि खासगी बँकांच्या सहकार्याने ही योजना राबवली जात आहे.

योजनेसाठी वयाची अट

१८ ते ७० वयोगटातील नागरिक पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचे वय ७० वर्षावरील असेल तर त्याला या योजनेचा फायदा घेता येणार नाही.


तैमूरनंतर करीनाने दुसऱ्या मुलाचे नाव ठेवले ‘जहांगीर’


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -