Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर अर्थजगत PM Kisan : ६००० रुपये मिळवून देणाऱ्या योजनेत तुमचे नाव आहे का?...

PM Kisan : ६००० रुपये मिळवून देणाऱ्या योजनेत तुमचे नाव आहे का? असे करा चेक

Related Story

- Advertisement -

देशातील गरीब सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. यातीलच एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana). या योजनेचा नव्वा हप्ता (PM Kisan 9th Installment) येत्या ऑगस्ट महिन्यात सुरु होईल. या योजनेंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात थेट २ हजार रुपयांची रक्कम हस्तांतरित केली जाते. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट्ये आहे. या योजनेंतर्गत शासनाने आतापर्यंत आठ हप्ते प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केला आहेत. जर आपणही या योजनेसाठी नोंदणी केली असेल तर आपले नाव या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे जाणून घेणे महत्वाचे आहे. कसे तपासाल तुमचे नाव…जाणून घ्या…

अशाप्रकारे जाणून घ्या माहिती

१) सर्वप्रथम ‘PM Kisan’ या अधिकृत वेबसाईट https://www.pmkisan.gov.in/ वर लॉग ऑन करा.

- Advertisement -

२) आता होमपेजवर ‘Farmers Corner’ वर तुम्हाला ‘Beneficiary List’ हे ऑप्शन दिसेल.

३) ‘Beneficiary List’ वर क्लिक करा.

- Advertisement -

४) आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.

५) यातील ड्रॉपडाऊन लिस्टमधून तुमच्या राज्य निवडा.

६) आता ड्रॉपडाऊन यादीतून जिल्हा, उपजिल्हा, आणि गाव सिलेक्ट करा.

७) आता ‘Get Report’ वर क्लिक करा.

आता तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी तुमच्या समोर दिसेल. यातून तुम्ही PM Kisan Beneficiary List मधील नाव पहावे लागेल. ही संपूर्ण लिस्ट Alphabetical Order प्रमाणे असते. एका पेजवर बर्‍याच लोकांची नावे असतात. तर लाभार्थ्यांची यादी बर्‍याच पेजवर असते.

जर आपले नाव या यादीमध्ये समाविष्ट केले असेल तर याचा अर्थ असा की, तुम्हाला PM Kisan Yojana चा लाभ मिळेल. जर आपले नाव या यादीमध्ये नसेल तर आपण आपल्या अर्जाची स्थिती तपासून पाहावी. यासाठी तुम्हाला ‘Farmers Corner’ मधील ‘Status of Self Registered/ CSC Farmers’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता Aadhaar No नंतर कॅप्चा कोड टाकून सर्च बटणावर क्लिक करा. जर स्टेटस पेंडिंग दिसत असेल तर तुम्ही पंPM Kisan Helpline No वर संपर्क करा. तर दुसरीकडे तुमच्या माहितीमध्ये काही चुकी झाल्यास तिही दुरुस्त करु शकतात.

 भरलेली चुकीची माहिती कशी कराल दुरुस्त 

१)सर्व प्रथम ‘Farmers Corner’ वर जा.

२) आता ‘Aadhaar No’ आणि कॅप्चा कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.

३) त्यानंतर ‘PM Kisan Application Form’ आपल्यासमोर दिसेल,

४) या फॉर्ममध्ये आपण आधार कार्डशी संबंधित तपशीलाशिवाय जवळपास प्रत्येक रखाण्यातील माहिती दुरुस्त करु शकतात.


 

- Advertisement -