Eco friendly bappa Competition
घर अर्थजगत UPIशी निगडित नियम बदलले; तुम्हाला कसा होणार फायदा? जाणून घ्या

UPIशी निगडित नियम बदलले; तुम्हाला कसा होणार फायदा? जाणून घ्या

Subscribe

MPCच्या बैठकीत UPIशी संबंधित मोठे निर्णयही घेण्यात आले आहेत. तसंच, ऑफलाईन पेमेंटची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी युपीआय पेमेंट वाढवण्यासाठी अनेक उपाय जाहीर केले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँक RBIच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठक पार पडली. 8 ऑगस्टपासून सुरू झालेल्या सहा सदस्यीय MPCच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे. ते म्हणाले की, यावेळी पॉलिसी रेट म्हणजेच, रेपो रेट कायम ठेवला आहे. म्हणजेच, सध्या रेपो रेट 6.5 टक्केच असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची चिंता काहीशी दूर झाली आहे. गृहकर्ज किंवा वाहन कर्ज घेणाऱ्यांवर EMI चा बोजा वाढणार नाही. ( RBI Governor Shaktikanta Das Major decisions related to UPI have also been taken in the MPC meeting the facility of offline payment will also be started )

MPCच्या बैठकीत UPIशी संबंधित मोठे निर्णयही घेण्यात आले आहेत. तसंच, ऑफलाईन पेमेंटची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी युपीआय पेमेंट वाढवण्यासाठी अनेक उपाय जाहीर केले आहेत. यामध्ये UPI लाईट ( UPI Lite) वरील ट्रान्झॅक्शन लिमिट 200 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत वाढवणं समाविष्ट आहे. लवकरच यूपीआयच्या माध्यामातून ऑफलाइन पेमेंटची सुविधाही आणली जाईल, असंही दास यांनी सांगितलं आहे. यासोबतच युपीआय प्ल‌ॅटफॉर्मवर कन्व्हर्सेशनल पेमेंटची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे. नियर फिल्ड कम्युनिकेशनद्वारे ऑफलाइन पेमेंट करता येणार आहे. याअंतर्गत युपीआय लाईटमधून 50 रुपयांपर्यंतच पेमेंट करता येणार आहे.

लिमिट वाढलं

- Advertisement -

अशाप्रकारे, रिझर्व्ह बँकेच्या या पतधोरण समितीच्या बैठकीत युपीआयशी संबंधित तीन घोषणा झाल्या आहेत. प्रथम, कन्व्हर्शेनल पेमेंटची सुविधा युपीआयवर सुरू केली जाईल. युपीआयवर ऑफलाइन पेमेंटची सुविधा असेल. तिसरी घोषणा म्हणजे युपीआय लाईटवरील ट्रान्झॅक्शन लिमिट 200 रुपयांवरून 500 रुपये करण्यात आली आहे.

( हेही वाचा: RBI MPC meet : कर्जदारांना दिलासा; रेपो रेट ‘जैसे थे’, आरबीआयचे पतधोरण जाहीर )

फेब्रुवारीपासून रेपो दरात बदल नाही

- Advertisement -

देशातील महागाईचा उच्चांक गाठल्यानंतर, रिझर्व्ह बॅंकेने रेपो दर निर्धारित मर्यादेत परत आणण्यासाठी मे 2022 पासून सलग नऊ वेळा वाढ केली होती. या कालावधीत हा दर 250 बेसिस पॉईंट्सनी वाढवला होता. महागाईवरील नियंत्रणासह, मध्यवर्ती बँकेनं त्याच्या वाढीला ब्रेक लावला आहे आणि फेब्रुवारी 2023 पासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. RBI रेपो दर स्थिर ठेवणार असल्याची शक्यताही अनेक तज्ज्ञ व्यक्त करत होते. यापूर्वी एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या बैठीकत हा दर स्थिर ठेवण्यात आला होता.

- Advertisment -