मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीने (MPC) घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज, गुरुवारी नवीन पतधोरण जाहीर केले. रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर ठेवून आरबीआयने कर्जदारांना दिलासा दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्था तसेच बँका मजबूत असून एनपीए कमी झाला आहे, असे शक्तिकांत दास म्हणाले.
RBI keeps repo rate unchanged in third straight policy meeting
Read @ANI Story | https://t.co/wzbclSgaDC#RepoRate #RBI #MPC #MonetaryPolicy #ShaktikantaDas pic.twitter.com/7VcpJNRFVI
— ANI Digital (@ani_digital) August 10, 2023
एमपीसीच्या बैठकीत व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय सर्व सदस्यांनी एकमताने घेतला, असे सांगून गव्हर्नर दास म्हणाले की, जागतिक स्तरावर व्याजदर दीर्घकाळ उच्च राहतील. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये महागाई आणि कर्जाची आव्हाने कायम आहेत. तथापि, भारत इतर देशांच्या तुलनेत आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यास अधिक सक्षम आहे.
हेही वाचा – ‘ईडी ही दहशतवादी संघटना’; संजय राऊतांचा घणाघात
आपली अर्थव्यवस्था योग्य गतीने पुढे जात आहे आणि ती जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. जागतिक विकासात भारतीय अर्थव्यवस्थेचे सुमारे 15 टक्के योगदान आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आर्थिक वर्ष 2024मध्ये 5.1 टक्क्यांवरून 5.4 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. तर, आर्थिक वर्ष 2024 मध्ये जीडीपी 6.5 टक्के असू शकते. तर आर्थिक वर्ष 2025मध्ये जीडीपी 6.6 टक्के राहण्याचा अंदाज आहे. 2025मध्ये सीपीआय 5.2 टक्के राहण्याचा अनुमान आहे, असेही शक्तिकांत दास म्हणाले.
हेही वाचा – सत्तेची नशा अशी असते का? पत्रकार मारहाण प्रकरणावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या एमपीसीच्या बैठकीत आरबीआयने रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची (बीपीएस) वाढ केली होती. तर, त्यानंतर एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या आर्थिक आढावा बैठकीतही रिझर्व्ह बँकेने रेपो दरात बदल केला नाही. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात घेतलेल्या पतधोरण आढाव्यात आरबीआयने रेपो दरात 35 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. मे 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत, आरबीआयने रेपो दरात 250 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 2.5 टक्के वाढ केली आहे.