घरअर्थजगतअदानी समूहाला देण्यात आलेल्या कर्जाचा आरबीआयने मागवला अहवाल 

अदानी समूहाला देण्यात आलेल्या कर्जाचा आरबीआयने मागवला अहवाल 

Subscribe

उद्योजक गौतम अदानी यांच्यामागे लागलेली साडेसाती काही संपण्याचे नाव घेत नसल्याचेच सध्या दिसून येत आहे. अदानी समूहाकडून २० हजार कोटी रुपयांचा एफपीओ रद्द करण्यात आल्यानंतर आता आरबीआयने अदानी समूहाला लक्ष केल्याचे दिसून येतेय. आरबीआयने अदानी समूहाला कोणत्या बँकेने किती कर्ज दिले? याचा अहवाल मागितला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या हिंडनबर्ग या संस्थेने एक अहवाल सादर करत अदानी समूहावर फेरफार आणि फसवणुकीचा आरोप केला होता, त्यानंतर अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये घसरण होण्यास सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर आता आरबीआय देखील सरसावली आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीनंतर आरबीआयकडून अदानी समूहाला कोणत्या बँकेने किती कर्ज दिले? याबाबतचा सविस्तर अहवाल मागविला आहे.

हिंडनबर्गने अहवालसादर केल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स जवळपास 50 टक्क्यांनी कोसळले. ज्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एलआयसीच्या शेअर्समध्ये देखील घसरण झालेली पाहायला मिळाली. परिणामी आता आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खासगी बँकांना आदेश जारी केले आहेत. कोणत्या बँकेने अदानी समूहाला किती कर्ज दिले? आणि त्याची आता नेमकी काय स्थिती आहे? याबाबतची माहिती मागविण्यात आली आहे.

- Advertisement -

सातत्याने अदानी समूहाच्या शेअर्समध्ये होणाऱ्या घसरणीनंतर अदानी समूहाकडून 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओसुद्धा रद्द करण्यात आला आहे. शेअर बाजारात सध्या जी काही स्थिती आहे, ती पाहूनच अदानी समूहाच्या संचालक मंडळाकडून एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती गौतम अदानी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिली.

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर गौतम अदानी यांची देखील श्रीमंत लोकांच्या यादीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. फोर्ब्सकडून जाहीर करण्यात आलेल्या टॉप-10 श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये गौतम अदानी हे चौथ्या क्रमांकावरून थेट 10 व्या क्रमांकावर घसरले आहेत. तर उद्योजक मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा अदानी यांना श्रीमंतांच्या यादीत मागे टाकले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पदवीधर निवडणूकीत गुलाल कुणाचा; रात्री ८ वाजेपर्यंत निवडणूक कल येणार समोर

इतकेच नाही तर, गौतम अदानी यांनी मागील वर्षी जेवढी रक्कम कमावली होती, त्यापेक्षा अधिक रक्कम त्यांनी गेल्या पाच दिवसांत गमावली आहे. ज्यामुळे आता मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा आशियातील श्रीमंत व्यक्ती ठरले. आता आरबीआयने अदानी समूहाला कोणत्या बँकेने किती कर्ज दिले आहे? आणि त्याची आता नेमकी स्थिती काय आहे? या अहवालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -