घरअर्थजगतIndia Post Recruitment 2023: इंडिया पोस्टमधील 98,083 रिक्त जागांसाठी भरती, 10वी पासनाही...

India Post Recruitment 2023: इंडिया पोस्टमधील 98,083 रिक्त जागांसाठी भरती, 10वी पासनाही नोकरीची संधी

Subscribe

ज्यांनी त्यांची इयत्ता 10वी आणि 12वी उत्तीर्ण गुणांसह किंवा त्याहून अधिक चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण केली आहे, ते भारतीय पोस्ट भरती 2023 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत

नवी दिल्लीः सरकारी नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या इच्छुकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागाने पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ इत्यादींसाठी एकूण 98,083 रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इंडिया पोस्टने आपल्या अधिकृत वेब पोर्टल indiapost.gov.in वर ही जाहिरात दिली आहे. एकूण 98083 रिक्त पदांपैकी पोस्टमनच्या 59099 जागा आणि मेल गार्डच्या 1445 जागा रिक्त आहेत. मल्टी-टास्किंग पदासाठी 23 मंडळांमध्ये एकूण 37539 रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत.

ज्यांनी त्यांची इयत्ता 10वी आणि 12वी उत्तीर्ण गुणांसह किंवा त्याहून अधिक चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण केली आहे, ते भारतीय पोस्ट भरती 2023 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. पात्रता निकषांचे इतर तपशील अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासले जातील.

- Advertisement -

भारतीय टपाल विभाग लवकरच भारतीय पोस्टल भरती 2023 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात तारीख आणि शेवटची तारीख याबद्दल अधिसूचना जारी करेल. या भरतीसाठी केवळ अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज केला जाऊ शकतो. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा ३२ वर्षे ठेवण्यात आली आहे.

कसा अर्ज कराल?

- Advertisement -

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in ला भेट द्यावी.

तुम्हाला होमपेजवर ‘इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट 2023’ ची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.

यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, येथे ‘Register Now’ वर क्लिक करा.

आता तुमच्या समोर एक नवीन टॅब उघडेल. येथे तुम्हाला स्वतःची नोंदणी करून घ्यावी.

नोंदणीनंतर उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

तपशील भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, अर्जाची फी भरावी लागेल.

फी भरल्यानंतर तुमचा नोंदणी फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आऊटदेखील घ्या.


हेही वाचाः छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर? राज्याभिषेक दिनानिमित्त नेत्यांचे

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -