घरअर्थजगतचमचमणार्‍या,लखलखणार्‍या नोटा

चमचमणार्‍या,लखलखणार्‍या नोटा

Subscribe

-रिझर्व्ह बँक नोटांना वार्निश कोटींग करणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता लवकरच चलनात 100 रुपयांची नवीन नोट जारी करणार आहे. आपल्या वार्षिक अहवालात बँकेने 100 रुपयांच्या नोटांना वार्निशचा कोट देण्याचे ठरविले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर काही नोटांना कोटिंग करण्यात येणार आहे.त्यामुळे सध्या चलनात असणार्‍या जांभळ्या रंगाच्या 100 रुपयांच्या नोटा आता आणखीच लखलखणार आहेत. तसेच या नोटांचे आयुष्यही वाढणार आहे.

कोटींग केल्याने नोटा लवकर फाटणार नाहीत. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाल्यास सर्व नोटांना वॉर्निश कोट लावण्यात येणार आहे. सध्या चलनात असलेल्या नोटा लवकर मळकट होतात किंवा फाटतात. दरवर्षी अशा करोडो रुपयांच्या फाटलेल्या किंवा मळकट नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला रिप्लेस कराव्या लागतात. सर्वसाधारण प्रत्येक पाचपैकी एक नोट दरवर्षी बाद करावी लागते. यासाठी जास्त निधी खर्च होतो. या समस्येचा सामना करण्यासाठी काही देश प्लास्टिकच्या नोटांचा वापर करतात.जगभरातील अनेक देशांत वार्निश नोटा वापरल्या जातात. त्यामुळे हा अनुभव पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशात वार्निश नोटा आणण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या याची सुरुवात 100 रुपयांच्या नोटांपासून होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -