आरबीआयकडून चार बँकांवर निर्बंध; महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा समावेश

या बँकांची आर्थिक बाजू ही काही प्रमाणात कोलमडली होती आणि हेच बघता आरबीआयने हे पाऊल उचलले आहेत.

RBI

रिझर्व्ह बँकेने(RBI) चार बँकांवर बंदी घालून या बँकांच्या व्यवहारांवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे त्याचा फाटका ग्राहकांना बसला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या या चार बँकांच्या ग्राहकांना आता फक्त आरबीआयने निश्चित केलेल्या मर्यादेतच त्यांचे पैसे काढता येणार आहेत. साईबाबा जनता सहकारी बँक, द सूरी फ्रेंड्स युनियन को – ऑपरेटिव्ह बँक लि सुरु (पश्चिम बंगाल) आणि नॅशनल अर्बन को – ऑपरेटिव्ह बँक लि या बँकांवर आरबीआयने निर्बंध लादले आहेत. या बँकांची आर्थिक बाजू ही काही प्रमाणात कोलमडली होती आणि हेच बघता आरबीआयने हे पाऊल उचलले आहेत.

हे ही वाचा –  देशातील या 2 बड्या बँकांवर रिझर्व्ह बँकेची कारवाई, ठोठावला 1 कोटींचा दंड

पैसे काढण्यावर निर्बंध

साईबाबा जनता सहकारी बँकेचे ठेवीदार २०. ००० रुपयांपर्यंत बँकेतून पैसे काढू शकतात त्याहून अधिक रक्कम काढू शकत नाही. सूरी फ्रेंड्स युनियन बँकेसाठी हीच मर्यादा ५०, ०००हजार रुपये एवढी आहे. तर नॅशनल अर्बन बँकेतून प्रत्येक ग्राहक १०, ००० एवढी रक्कम काढू शकतो.

हे ही वाचा – साहेबराव देशमुख आणि सांगली सहकारी बँकांवर आरबीआयचे निर्बंध

६ महिन्यांपर्यंत नियम लागू

आरबीआयने(RBI) बिजनौर आधारित युनायटेट इंडिया को – ऑपरेटीव्ह बँक लिमिटेडवरही निर्बंध लादले आहेत. त्यामुळे ग्राहकांनाही या बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध असणार आहेत. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट १९४९ च्या अंतर्गत मध्यवर्ती बँकेने ४ सहकारी बँकांना या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर आरबीआयने लादलेले हे नियम तब्बल ६ महिन्यांपर्यंत लागू असणार आहेत. आरबीआयने सांगितलं, फसवणुकी संबंधी काही नियमांचं उल्लंघन केल्याने आणि त्याचबरोबर सूर्योदय स्मॉल फायनान्स बॅंकेला ५७. ७५ लाख रुपयांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आला. दुसर्‍या निवेदनात, रिझर्व्ह बँकेनं सांगितले की, त्यांनी फसवणुकी संबंधित काही नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेला 57.75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

हे ही वाचा – मोदींनी आणखी एक सरकारी कंपनी विकली, दोन वर्ष बंद कंपनीला टाटांनी घेतलं…