घरअर्थजगतPF मधून पैसे काढण्याचे नियम बदलले; आता ३ दिवसांत पैसे येणार खात्यात,...

PF मधून पैसे काढण्याचे नियम बदलले; आता ३ दिवसांत पैसे येणार खात्यात, जाणून घ्या प्रोसेस

Subscribe

जाणून घ्या पैसे काढण्याची प्रोसेस.

ईपीएफओ सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आता पीएफ (PF) खात्यातून पैसे काढल्यानंतर केवळ ३ दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. ग्राहकांना भविष्य निर्वाह निधीतून आगाऊ पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत सदस्यांना भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा होणाऱ्या रक्कमेपैकी ७५ टक्के रक्कम काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. कामगार मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ग्राहकांना मदत करण्यासाठी ईपीएफओने (EPFO) ने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे’. यामुळे कोरोनाच्या या महामारीत ग्राहकांना मोठा आधार झाला आहे. कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे ग्राहकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

५ कोटी ग्राहकांना मिळणार दिलासा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्राहकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने सेवानिवृत्ती निधी व्यवस्थापन मंडळाच्या ईपीएफओने पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे तब्बल पाच कोटी ग्राहकांना त्याचा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या माहामारीत दुसऱ्यांदा अशी संधी देण्यात आली असून पहिल्या लाटेत देखील अशी संधी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा ही संधी ग्राहकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

ऑनलाईन पैसे काढण्याची जाणून घ्या पद्धत

  • EPFO वर लॉग इन करा
  • Online Service वर Claim (फॉर्म-३१,१९ आणि १०C) पर्याय निवडा
  • स्क्रिनवर आलेल्या बॉक्सवर खात्याचे शेवटचे ४ अंक टाकून वेरिफायवर क्लिक करा
  • नियम आणि अटी वाचून नंतर Proceed Online Claim वर क्लिक करा
  • त्यानंतर पीएफ advance (Form 31) निवडावे
  • नंतर तुम्हाला कारण निवडावे लागेल, तुम्ही advance पैसे का काढत आहात
  • कारण दिल्यानंतर रक्कम आणि पूर्ण पत्ता भरुन फॉर्म submit करा
  • नियोक्त्याच्या अप्रूव्हलनंतर तुमच्या खात्यात ३ दिवसानंतर पैसे येतील

    हेही वाचा – Mutual Fund च्या ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक, एका वर्षात पैसे होतील डबल


Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -