Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर अर्थजगत SBI ग्राहकांसाठी आज रात्री 'या' वेळात बँकिंग सेवा राहणार बंद!

SBI ग्राहकांसाठी आज रात्री ‘या’ वेळात बँकिंग सेवा राहणार बंद!

Related Story

- Advertisement -

जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना शनिवार आणि रविवारी बँकिंगशी संबंधित ऑनलाइन सेवांचा लाभ घेण्यासाठी काही अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. इंटरनेट बँकिंग सेवा शनिवार, ४ सप्टेंबर रोजी रात्री साडे दहापासून ते रविवारी म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजेपर्यंत बंद राहणार आहे. एसबीआयने आपल्या ट्विटरद्वारे ही माहिती ग्राहकांना दिली आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही बँकिंगशी संबंधित कामे असतील तर ती त्वरित करा, अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

एसबीआयच्या या सेवांमध्ये योनो, योनो लाइट, योनो बिझनेस, आयएमपीएस आणि यूपीआय यांचा समावेश असणार आहे. यामुळे, ग्राहक या काळात कोणताही बँकिंग व्यवहार करू शकणार नाहीत. यासह, एसबीआय इंटरनेट बँकिंग व्यतिरिक्त YONO, YONO Lite, YONO Business, IMPS किंवा UPI द्वारे बँकिंग व्यवहार करणारे SBI ग्राहक शनिवारी दुपारी 22.35 ते रविवारी दुपारी 1.35 पर्यंत या सेवेपासून वंचित राहणार आहे, यामुळे एसबीआयने ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी एक ट्विट देखील केले आहे.

- Advertisement -

एसबीआयने ट्वीट करून अशी माहिती दिली की, ऑनलाईन मॅन्टनेन्सचं काम असल्याने ही सेवा बंद करण्यात येणार आहे. यापूर्वी १७ जून रोजी देखरेखीच्या कामामुळे एसबीआयची योनो सेवा साधारण २ तास बंद करण्यात आला होता. एसबीआयने ट्वीट करून अशी माहिती दिली की, ऑनलाईन मॅन्टनेन्सचं काम असल्याने ही सेवा बंद करण्यात येणार आहे. यापूर्वी १७ जून रोजी देखरेखीच्या कामामुळे एसबीआयची योनो सेवा साधारण २ तास बंद करण्यात आला होता. देशातील सर्वात मोठी बँक SBI च्या इंटरनेट बँकिंग सेवा ८.५ कोटी लोक वापरतात आणि मोबाईल बँकिंग १.९ कोटी लोक वापरतात. तर, योनोवर नोंदणीकृत ग्राहकांची संख्या ३.४५ कोटी आहे, ज्याद्वारे दररोज साधारण ९० लाख लोक लॉग इन करतात.


- Advertisement -

 

- Advertisement -