घरअर्थजगतसेन्सेक्स तब्बल 1158.08 ने कोसळला, गुंतवणूकदारांना ५.५ लाख कोटींचा फटका

सेन्सेक्स तब्बल 1158.08 ने कोसळला, गुंतवणूकदारांना ५.५ लाख कोटींचा फटका

Subscribe

सेन्सेक्स 480 अंकांनी घसरून 53,608.35 वर उघडला होता. तर निफ्टी 181 अंकांच्या घसरणीसह 15,935.20 च्या पातळीवर उघडला. गुरूवारी रुपयाने डॉलरच्या तुलनेत नवा नीचांक गाठला आहे. रुपया 30 पैशांनी घसरून 77.55 वर उघडला.

भारतीय शेअर बाजारात गुरुवारी सलग पाचव्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 1158.08 अंकांनी कोसळला. तर  निफ्टीनेही 359.10 अंकांची मोठी घसरण नोंदवली. या मोठ्या पडझडीत गुंतवणूदारांना ५.५ लाख कोटी रुपयांचा फटका बसला. गुरुवारी बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.

अमेरिकेतील महागाई,  डॉलरच्या तुलनेत सातत्याने रूपयात होत असलेली घसरण, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री, रशिया-युक्रेन युद्ध, पामतेल आयात थांबवणे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आदी प्रमुख कारणे देशातील शेअर बाजारातील घसरणीमागे आहेत. शेअर बाजारात ५ मेपासून सातत्याने घसरण सुरू आहे.  मात्र, 4 मे ची थोडीसी वाढ सोडली तर  28 एप्रिलपासून बाजार सातत्याने घसरत आहे. गुरूवारी सेन्सेक्स आणि निफ्टी 2 टक्क्यांहून अधिक घसरले.  आहेत. दिवसाअखेर सेन्सेक्स  52930 वर तर निफ्टी 15808 च्या वर बंद झाला.

- Advertisement -

सेन्सेक्स 480 अंकांनी घसरून 53,608.35 वर उघडला होता. तर निफ्टी 181 अंकांच्या घसरणीसह 15,935.20 च्या पातळीवर उघडला. गुरूवारी रुपयाने डॉलरच्या तुलनेत नवा नीचांक गाठला आहे. रुपया 30 पैशांनी घसरून 77.55 वर उघडला. तथापि, त्यानंतर तो थोडासा सावरला आणि 19 पैशांनी घसरून 77.44 वर बंद झाला. सेन्सेक्समधील विप्रो वगळता सर्व शेअर्स घसरले. इंडसइंड बँक 5.82 टक्के, टाटा स्टील 4.13 टक्के, बजाज फायनान्स 3.76 टक्के घसरले,  रिलायन्स इंडस्ट्री 2 टक्क्यांनी घसरले. शेअर बाजारात आज चौफेर विक्री झाली आहे

बुघवारी अमेरिकेत महागाईचे आकडे आले असून त्यात घसरण झाली आहे. मात्र, ही घसरण अपेक्षेपेक्षा कमी राहिली असून, चलनवाढीचा प्रभाव अंदाजापेक्षा अधिक असल्याचे संकेत मिळत आहेत. आणि ते कमी व्हायला वेळ लागू शकतो. या संकेतांमुळे परदेशी बाजारात घसरण झाली असून डॉलर मजबूत झाला आहे. किंबहुना, चलनवाढीच्या दबावामुळे, फेडरल रिझर्व्ह व्याज दरात वाढ करेल अशी भीती अधिक गडद होत आहे. देशांतर्गत बाजारातील घसरणीचे आणखी एक कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांनी देशांतर्गत बाजारातून पैसे काढून घेणे. आगामी काळात विदेशी गुंतवणूकदार अधिक पैसे काढू शकतात, त्यामुळे बाजारावर दबाव वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -