सेन्सेक्स १४५० ने कोसळला, गुंतवणूकदारांना ५ लाख कोटींचा फटका

अमेरिका शेअर बाजारात घसरण होण्यामागील मुख्य कारण महागाई आहे. अमेरिकेतील महागाई ४० वर्षांवर पोहोचली आहे. शेअर बाजारात निफ्टी १५८१३ अंकांवर व्यवहार करत आहे.

share market crash nifty and sensex falls
शेअर बाजारात मोठी घसरण, निफ्टीत ३२४ अंकांच्या घसरणीची नोंद

भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाले. सेन्सेक्स १,११९ अंकांच्या घसरणीसह ५३ हजार १८४ वर उघडला. निफ्टीही ३२४ अंकांच्या घसरणीसह १५,८७७.५५ वर उघडला. त्यानंतर घसरण वाढत जाऊन सेन्सेक्स १४५० अंकाने कोसळला. या मोठ्या पडझडीत गुंतवणूकदारांना तब्बल ५ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

सध्या दोन्ही निर्देशांक ३% पेक्षा जास्त घसरणीसह व्यवहार करत आहेत. सर्वात मोठी घसरण बँकिंग क्षेत्रात दिसून येत आहे. मेटल आणि आयटी समभागातही २% पेक्षा जास्त घट झाली आहे.अमेरिकेतील वाढत्या चलनवाढीमुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदरात मोठी वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम देशातील शेअर बाजारावरही झाला. अमेरिका शेअर बाजारात घसरण होण्यामागील मुख्य कारण महागाई आहे. अमेरिकेतील महागाई ४० वर्षांवर पोहोचली आहे.

शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये टॉप ३० स्टॉक्सपैकी फक्त दोन शेअरमध्ये खरेदी प्रक्रिया सुरु असल्याची नोंद करण्यात आली. टाटा मोटर्स, एचडीएफसी, विप्रो, हिंदाल्कोसारख्या कंपन्यांचे शेअर पडले आहेत. तसेच टॉप ३० स्टॉक्सपैकी २८ स्टॉक्सच्या दरात घसरण झाली आहे. बजाज फिनसर्व्ह ४.७४ टक्के, बजाज फायनान्स ४.४२ टक्के, आयसीआयसीआय बँक ३.८२ टक्के, लार्सन ३,७४ टक्के, एसबीआय ३.७२ टक्के, एचडीएफसी ३.३७ टक्के, कोटक महिंद्रा ३.७२ टक्के, टेक महिंद्रा ३,२६ टक्के ३.११ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

रुपयामध्ये घसरण

शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा रुपयावरसुद्धा परिणाम झाला आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचे मूल्य ७८.२० रुपये झाले. या घसरणीनंतर पहिल्यांदाच रुपयाची नीचांकी नोंद झाली आहे. अमेरिकेमध्ये वाढलेल्या महागाईमुळे बाजारात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या दरात वाढ झाली आहे. बाजारात १२० डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार होत आहे.


हेही वाचा : नॅशनल हेराल्ड केस; राहुल गांधींच्या समर्थनार्थ रॅलीवर बंदी