SIP Calculator : दिवसाला १६७ रुपयांच्या बचतीवर बनू शकता तुम्ही ११ कोटी रुपयांचे मालक, जाणून घ्या कसे?

money
प्रातिनिधीक फोटो

भविष्यातील अडचणी लक्षात घेता आर्थिक गुंतवणूक करणे केव्हाही फायदेशीर ठरते. मात्र ही गुंतवणूक कुठे, कशी आणि केव्हा करावी असे अनेक प्रश्न पडत असतात. यासाठी अनेक जण तज्ज्ञांचा सल्ला घेतात. परंतु छोट्या रकमेपासून केलेली गुंतवणूक काही वर्षांनंतर कोट्यावधीपर्यंत पोहचू शकते. ही रक्कम मुलांचे शिक्षण, घरबांधणी, घर खरेदी, किंवा आजारपणासारख्या अडचणींच्या काळात उपयुक्त ठरु शकते. त्यामुळे प्रत्येकाने छोटीशी का होईना आपण वयानुसार गुंतवणुकीला सुरुवात केली पाहिजे. सध्याच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी ‘म्युचअल फंड’ हा चांगला पर्याय पुढे येत आहे. त्यामुळे म्युचअल फंडमध्ये दिवसाला १६७ रुपयांची बचतीवर तुम्ही भविष्यात ११ कोटी रुपयांपर्यंत कमाई करु शकतात. म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही कमाई वाढवण्याबरोबरचं स्वत:चे भविष्यही सुरक्षित करु शकता.

तज्ञांच्या मते, आपण नोकरीच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांपासूनच म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये इनवेस्ट करु शकतात. यामुळे तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूकीबद्दल (long विचार करण्यास अनेक माहिती मिळेल. वास्तविक दीर्घकालीन गुंतवणूकींमध्ये जोखीम व्यवस्थापन अधिक चांगले असते. तसेच आर्थिक नुकसान होण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे प्रत्येक महिन्यात आपली छोटी गुंतवणूक कोट्यावधी रुपयांचा निधी उत्पन्न करते. कसे ते जाणून घेऊ…

म्युच्युअल फंड एसआयपीचे कॅल्कुलेशन 

जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षापासून एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर दरमहा ५००० रुपये अर्थात दिवसाचे १६७ रुपयांची गुंतवणूकीस सुरुवात केली आहे. म्हणजेच वयाच्या ६० व्या वर्षी तुमची जमा झालेली रक्कम ११. ३३ कोटी रुपये असणार आहे. यातील खास गोष्ट म्हणजे तुम्हाला दरवर्षी १० टक्क्यांनी आपली गुंतवणूक वाढवत ठेवावी लागणार आहे. यातून तुम्हाला अंदाजे १४ टक्के परतावा मिळणार आहे. या गुंतवणूकीचा एकूण कालावधी ३५ वर्षे ठेवण्यात आला आहे. म्हणजे तुमची एकूण गुंतवणूक १.६२ कोटी रुपये असेल आणि तुमचे एकूण उत्पन्न ९.७० कोटी रुपये असेल. म्हणजेच तुमची एकूण मॅच्युरिटी रक्कम ११.३३ कोटी रुपये असेल.

कंपाउंडिंगमुळे मिळतील अधिक फायदे

तज्ज्ञांच्या मते, तुमच्या ५००० रुपयांच्या मासिक गुंतवणूकीमुळे तुमच्याकडे ३५ वर्षानंतर ११.३३ कोटी रुपयांची रक्कम जमा होईल. परंतु यातील एक गोष्ट लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे ते म्हणजे, दरवर्षी तुमचा वाढत्या पगाराबरोबरच एसआयपीमधील गुंतवणूकही वाढवावी लागेल. ज्यामुळे ३५ वर्षांनंतर एसआयपीमध्ये तुम्हाला कंपाउंडिंगमध्ये फायदा मिळेल. दीर्घकालीन एसआयपीमध्ये तुम्हाला १२ ते १६ टक्के परतावा देखील मिळतो.


Jio, Vi, Airtel, BSNL चे ८४ दिवसांच्या वॅलिडिटीचे बेस्ट प्रीपेड प्लॅन, अनलिमिटेड डेटासह अनेक फायदे