घरअर्थजगतबँक ऑफ बडोदाकडून स्टार्ट-अप बँकिंग कार्यक्रम

बँक ऑफ बडोदाकडून स्टार्ट-अप बँकिंग कार्यक्रम

Subscribe

बँक ऑफ बडोदा या भारतातील दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेने स्टार्ट-अपसाठी पसंतीची बँकिंग पार्टनर बनण्यासाठी आणि येत्या दोन वर्षांत किमान 1000 स्टार्ट-अपशी जोडले जाण्यासाठी बडोदा स्टार्ट-अप बँकिंग कार्यक्रम दाखल केला आहे.

स्टार्ट-अप्स मुळे रोजगारनिर्मिती होऊन आणि नावीन्य साधले जाऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. भारतात जगातील तिसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट-अप व्यवस्था आहे, 15,000 हून अधिक स्टार्ट-अप्स ना सरकारने मान्यता दिली आहे. येत्या काही वर्षांत 5,000 स्टार्ट-अप्स ची वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

या कार्यक्रमांतर्गत, बडोदा स्टार्ट-अप ब्रँचेस विविध प्रकारची बँकिंग उत्पादने व सेवा सादर करणार असून त्यांची निर्मिती स्टार्ट-अप्स च्या विशेष बँकिंग गरजांच्या अनुषंगाने केली आहे. उत्पादनांमध्ये बँकेच्या सध्याच्या उत्पादनांबरोबरच, कस्टमाइज्ड स्टार्ट-अप करंट अकाउंट, अद्ययावत पेमेंट गेटवे, कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड व क्रेडिट सुविधा यांचा समावेश आहे.
बँक ऑफ बडोदा चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एस. जयकुमार यांनी सांगितले , “स्टार्ट-अप्स च्या विशिष्ट गरजांबद्दल मार्केट रिसर्चमधून मिळालेल्या तपशिलाच्या अनुसार आम्ही हा कार्यक्रम तयार केला आहे.बडोदा स्टार्ट-अप ब्रँचेसमध्ये विशेष रिलेशनशिप मॅनेजर असतील आणि ते स्टार्ट-अप्स बरोबर भागीदारी करतील व त्यांना सहभागी करून घेतील. यामुळे सरकारच्या स्टार्ट-अप इंडिया योजनेतही योगदान दिले जाईल.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -