केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ च्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली आहे. बुधवारी बाजार उघडण्याच्या वेळी सेन्सेक्स सर्वांत वेगाने वाढून ४५० अंकांपर्यंत उसळी घेतलीय. सध्या तो ४१३ अंकांच्या वाढीसह ५९,९६३ अंकांवर आला आहे. तसंच निफ्टी १०७ अंकांच्या वाढीसह १७,७०७ अंकांवर व्यवहार करत आहे. याआधी बुधवारी सेन्सेक्स ४५१.२७ अंकांच्या वाढीसह ६०,००१.१७ अंकांच्या पातळीवर उघडला. निफ्टीमध्ये १७,८११.६० अंकांच्या पातळीवर व्यवहार सुरू झाला. सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १० पैशांनी वाढ होऊन ८१.७८ वर पोहोचला.
२०२३-२४ च्या बजेटमध्ये निफ्टी टॉप गेनर्स आणि टॉप लॉजर्स
आज सलग दुसऱ्यांदा निर्देशांक सकारात्मक बंद झाला. निर्देशांकातील तेजीला आयसीआयसीआय बँक, आयटीसी, स्टेट बँक आँफ इंडिया यांनी पाठिंबा दिला. निफ्टीतल्या २४ स्टॉक्समध्ये वाढ तर २५ शेअर्समध्ये घट झाली. टॉप गेनर्सच्या यादीत एसबीआय, महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवर ग्रीड, अल्ट्रा टेक सिमेंट, अदानी पोर्ट्स यांचा समावेश होता. तर टॉप लूजर्सच्या यादीत बजाज फायनान्स, टीसीएस, टेक महिद्रा, ब्रिटानिया आणि एचडीएफसी या कंपन्यांची वर्णी लागली होती.
Sensex opens in green, currently up by 437.32 points and trading at 59,987.22. pic.twitter.com/e9yowlYz6U
— ANI (@ANI) February 1, 2023
कोणत्या स्टॉकमध्ये नफा?
निफ्टीमध्ये आज एसबीआयने सर्वाधिक वाढ केली. यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा ३.४१ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. पॉवरग्रीड, अल्ट्राटेक सिमेंट आणि अदानी पोर्ट्समध्येही आज २.७३ टक्क्यांनी वाढ झाली. दुसरीकडे, बजाज फायनान्स आणि टीसीएस २ टक्क्यांहून अधिक तोट्यासह बंद झाले. यानंतर टेक महिंद्रा, ब्रिटानिया आणि एचडीएफसी लाइफ आज १ टक्क्यांहून अधिक घसरणीसह सर्वात खाली आहे.