घरअर्थजगतशेअर बाजारात घसरगुंडी

शेअर बाजारात घसरगुंडी

Subscribe

विकासाच्या कासवगतीचा बाजारावर परिणाम

जीडीपीच्या दरात होणारी घसरण तसेच इतर महत्वाच्या क्षेत्रांच्या कासवगतीचा शेअर बाजारावर झाला. उत्पादन क्षेत्रात ऑगस्टमध्ये विक्री घटल्याने शेअर बाजारात निराशा आहे. उत्पादन घटल्याने केलेली गुंतवणूक आणि खर्च यातील नुकसानही अद्याप भरून निघाले नाही. याआधी जूनच्या तिमाहीत जीडीपी दर सहा वर्षांतील निच्चांकीवर पोहोचले होते. मंगळवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास सेन्सेक्समध्ये तब्बल ८०० अंकांची घसरण नोंदवली आली आहे. त्यामुळे तो ३६,५००वर पोहोचला. निफ्टीतही २४.४० अंकांची घसरण नोंदवून तो १०७८२.८५ वर पोहोचला आहे.

सुरुवातीच्या सत्रात सकाळी १०.२२ वाजता सेन्सेक्स ४१३.५८ अंकांनी घसरून ३६, ९१९.२१ अंकांवर व्यवहार सुरू होते. निफ्टीतही १२९.३० अंकांची घसरण नोंदवली होती. ऑगस्टमध्ये वाहन विक्रीच्या आकडेवारीमुळे शेअर बाजारात निराशा आहे. मारुती सुझुकीच्या विक्रीत ३३ टक्क्यांहून अधिक घट झाली. टाटा मोटर्सच्या पेसेंजर वाहनांची विक्रीही ५८ टक्क्यांनी घसरली आहे. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटोच्या वाहन विक्रीतही घट नोंदवण्यात आली आहे.

- Advertisement -

अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉरचा परिणामही मुंबई शेअर बाजारावर दिसत आहे. त्याचाच परिणाम म्हणून सेन्सेक्स जवळपास 800 अंकांनी घसरला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 1.39 लाख कोटी रुपये बुडाले. महत्त्वाचे म्हणजे सेन्सेक्सच्या 30 पैकी 27 शेअर्स कोसळले. तर निफ्टीमध्येही 50 पैकी 44 शेअर्सनी गटांगळ्या खाल्ल्या. बँकिंग, ऊर्जा आणि धातू यासारख्या क्षेत्रातील शेअर्स सर्वाधिक कोसळले.

आयटी शेअर्स उच्चांकावर

एकीकडे सेन्सेक्स कोसळत असताना इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (टीसीएस) या कंपन्यांचे शेअर्स वधारले. इन्फोसिसचे शेअर्स 822.40 रुपयांवर तर टीसीएसचे शेअर्स 2296.20 रुपयांवर पोहोचले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -