घरअर्थजगतहिरे व्यापार्‍याला मंदीचा फटका

हिरे व्यापार्‍याला मंदीचा फटका

Subscribe

यावर्षी कार, दागिने, घरांचा बोनस नाही

बाजारात आलेल्या सुस्तीचा फटका हिरा व्यापारालाही बसला आहे. व्यवसाय मंदावल्याने हिर्‍यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या सूरतमधील हिरा व्यापाराची चमकसुद्धा फिकी पडली आहे. त्यामुळे सुमारे पाच लाख कामगारांना यंदाच्या दिवाळीत बोनस आणि अन्य लाभांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी दिवाळीत कामगारांना भेट म्हणून कार, दागिने आणि घर देण्यासाठी प्रसिद्ध असलेले हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांच्या व्यवसायालाही मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांनी यावेळच्या दिवाळीत कामगारांना देण्यात येणार्‍या भेटवस्तूंबाबत हात आखडता घेण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत विचारणा केली असता सावजी ढोलकिया म्हणाले की, यावर्षी आलेली मंदी ही 2008 मध्ये आलेल्या मंदीपेक्षा गंभीर आहे. आता पूर्ण उद्योगच मंदीची शिकार झाला असेल तर भेटवस्तूंच्या खर्चाचा भार आम्ही कसा काय उचलू शकतो. सध्या आम्ही हिरे उद्योगात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांच्या उपजीविकेबाबत चिंतीत आहोत. गेल्या सात महिन्यांमध्ये हिरे उद्योगातून सुमारे 40 हजार लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. तसेच जे काम करत आहे त्यांच्या वेतनामध्येसुद्धा सुमारे 40 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे.

- Advertisement -

मंदीच्या परिस्थितीमध्ये ज्या कंपन्या काम करत आहेत, त्यांना आपले काम कमी करणे भाग पडत आहे. यावर्षी हिरे व्यवसायातील दिग्गज कंपनी असलेल्या डी बीयर्सलाही आपले उप्तादन घटवावे लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -