घरअर्थजगत‘स्पीड डायल - आयुष्यभराचा साथीदार’ उपक्रमाची सुरुवात

‘स्पीड डायल – आयुष्यभराचा साथीदार’ उपक्रमाची सुरुवात

Subscribe

देशातील आघाडीच्या आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (मॅक्स लाइफ/कंपनी) ‘स्पीड डायल मॅक्स लाइफ इन्शुरन्स – तुमचा आयुष्यभराचा साथीदार’ या, ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवणार्‍या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमांतर्गत मॅक्स लाइफ आपल्या प्रत्येक ग्राहकाला स्वतंत्र रिलेशनशिप मॅनेजर उपलब्ध करून देणार असून आयुष्यभराचा साथीदार या नावाने ओळखला जाणारा हा रिलेशनशिप मॅनेजर ग्राहकांच्या पॉलिसीशी निगडीत सर्व प्रकारच्या गरजांच्या पूर्तीसाठी मदत करणार आहे. या उपक्रमाच्या मार्फत हे आयुष्यभराचे साथीदार केवळ एका फोनवर सर्व प्रकारच्या गरजा भागवण्यासाठी साह्यभूत ठरणार असून ग्राहकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी लागणार्‍या वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. ग्राहकांनी विचारणा केल्यास कंपनीचे डिजिटल सेवा पर्याय आणि नव्या उत्पादनांविषयी ग्राहकांना सजग करण्याचे कामही ते करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -