घरअर्थजगतमंदीवर तात्काळ उपाययोजनेची गरज -रघुराम राजन

मंदीवर तात्काळ उपाययोजनेची गरज -रघुराम राजन

Subscribe

मंदी ही चिंताजनक बाब असून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत रिजर्व बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. देशाला आर्थिक सुधारणांची गरज असून थातूर-मातूर उपायांनी यावर दिलासा मिळू शकणार नाही, उर्जा आणि बँकेतर वित्तीय संस्थांच्या क्षेत्रात मोठ्या सुधारणा करण्याची गरज आहे आणि सरकारने यावर तात्काळ काम केलं पाहिजे असं मत राजन यांनी व्यक्त केलं आहे. जीडीपी मोजण्याच्या बदललेल्या पद्धतीवरही राजन यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

विकास दराचं खरं चित्र काय आहे हे समोर असल्याशिवाय प्रभावी उपाययोजना केल्या जाऊ शकत नाहीत. खासगी संस्थांच्या विकासदराच्या आकडेवारी आणि सरकारच्या आकडेवारीत फरक आहे. अशा वेळी अर्थव्यवस्थेतील मंदी हा खरंच चिंतेचा विषय आहे, असं मत रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 2018-19 मध्ये 6.8 टक्के इतका होता. 2014-15 पेक्षा हा सर्वांत कमी विकास दर आहे. रिजर्व बँक आणि खासगी संस्थांच्या आकडेवारीनुसार दरडोई ढोबळ उत्पन्न हे सरकारी 7 टक्के अनुमानाच्या कमी असणार आहे. याचाच अर्थ यंदाची मंदी खूप मोठी आहे.

ऑटो सेक्टर हे दोन दशकांमधल्या सगळ्यांत वाईट काळातून जात आहे. ऑटो आणि निगडीत क्षेत्रात बेरोजगारीचं संकंट वाढलंय. बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री बंद दिसतेय, एफएमसीजी कंपन्यांच्या व्यवसायातही घट झालीय. या परिस्थितीवर भाष्य करताना राजन म्हणतात की, तुमच्या आसपासच्या सर्व उद्योगांमधून आता हा चिंतेचा स्वर उमटू लागला आहे, अशा वेळी त्या सर्वांना दिलासा देण्याची गरज आहे, असे राजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -