घरअर्थजगतआरबीआयच्या एका गव्हर्नरच्या बडतर्फीची केली होती शिफारस

आरबीआयच्या एका गव्हर्नरच्या बडतर्फीची केली होती शिफारस

Subscribe

केंद्रीय परिवहनमंत्री गडकरी यांची धक्कादायक माहिती

रिझर्व्ह बँकेच्या एका गव्हर्नरास तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस आपण तत्कालीन वित्तमंत्र्यांकडे केली होती, असे वक्तव्य केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. मात्र बडतर्फ करण्याची शिफारस केलेले गव्हर्नर कोण हे मात्र गडकरी यांनी सांगितले नाही.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर किती अडेलतट्टू भूमिका घेतात तसेच त्यांच्या भूमिकेमुळे अर्थव्यवस्थेवर कसा प्रतिकूल परिणाम होतो, हे सांगताना गडकरी यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात सांगितले की, हा गव्हर्नर चांगला नाही. त्याला तात्काळ बडतर्फ केले पाहिजे, असे आपण वित्तमंत्र्यांना सांगितले होते. रालोआच्या पहिल्या कार्यकाळात अरुण जेटली आणि पीयूष गोयल हे वित्तमंत्री होते. त्या काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद रघुराम राजन आणि ऊर्जित पटेल यांनी सांभाळले. राजन यांना दुसरा कार्यकाळ मिळाला नाही. तर पटेल यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला. यापैकी कोणाचेही नाव गडकरी यांनी घेतले नाही. त्यांनी केवळ ’वित्तमंत्री’ आणि ’रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर’ असाच मोघम उल्लेख केला.

- Advertisement -

गडकरी यांनी म्हटले की, गव्हर्नरांचे मन वळविण्याचा मी खूप प्रयत्न केला. तथापि, ते अडून राहिले. नंतर वित्तमंत्र्यांनी मला सांगितले की, त्यांनी (गव्हर्नर) राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. मात्र त्यांनी तसे केलेले नाही. त्यावर मी वित्तमंत्र्यांना सांगितले की, ते स्वत: जाणार नसतील तर त्यांना हाकलून लावणे योग्य राहील. ते चांगले नाहीत. रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडून बँकिंग क्षेत्र सकारात्मक भूमिकेची अपेक्षा करू शकते, असेही गडकरी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -