घरअर्थजगतहाँगकाँगमधील परिस्थितीचा परिणाम बीजिंगमधील आर्थिक घसरणीवर

हाँगकाँगमधील परिस्थितीचा परिणाम बीजिंगमधील आर्थिक घसरणीवर

Subscribe

हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थकांच्या आंदोलनावर सामोपचाराने तोडगा काढायला हवा. कारण याचा परिणाम थेट बीजिंगमधील आर्थिक घसरणीवर होत आहे, असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. बुधवारी ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटमध्ये याविषयीच्या सर्व शक्यतांवर भाष्य केले. बीजिंगमधील राजकीय अस्वस्थतेवर शांततेच्या मार्गाने तोडगा निघू शकतो. चीनमधील बेरोजगारी वाढली आहे़, तेथील नोकर्‍या कमी झाल्या आहेत, अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडत आहेत. बीजिंगमधील आंदोलनाचा फटका उद्योगांना बसत आहे़ ही परिस्थिती बदलण्यासाठी चीनने आधी हाँगकाँगकडे लक्ष केंद्रित करायला हवे, असे ट्रम्प यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष झी पिंग हे या परिस्थितीवर नम्रपणे व तातडीने तोडगा काढू शकतील, याची मला पूर्ण खात्री आहे, असे मत व्यक्त करत ट्रम्प यांनी झि पिंग यांच्याशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला. हाँगकाँगमधील आंदोलनाला तेथील विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला कधी कधी हिंसक वळणही लागते़ १९९७ साली ब्रिटिशांनी हाँगकाँगमधून माघार घेतली. येथील स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची अट ब्रिटिशांनी घातली. त्यामुळे येथील सरकारसमोर या अटीचे मोठे आव्हान आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -