घरअर्थजगतगुंतवणूकदारांचा तब्बल ११ लाख कोटींचा फायदा

गुंतवणूकदारांचा तब्बल ११ लाख कोटींचा फायदा

Subscribe

कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यापासून शेअर बाजारात तेजी आली असून, ही तेजी सोमवारीही कायम असल्याचं पाहायला मिळालं. तसेच बाजारातील वाढलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचा एकूण 11 लाख कोटींचा फायदा झाला असल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सकाळी भारतीय उद्योगजगतासाठी विविध करसुधारणांची घोषणा केली. बाजाराने या सुधारणांचे जोरदार स्वागत केले. त्यावेळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक, सेन्सेक्स 121.45 अंकांनी वाढून 36214.92 अंकांवर खुला झाला होता. त्यानंतर तो 38378.02 अंकांपर्यंत वाढला होता. बाजाराच्या अखेरच्या सत्रामध्ये नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीमुळे तो काहीसा खाली येऊन 38,014.62 अंकांवर बंद झाला. मागील निर्देशांकाच्या तुलनेमध्ये तो 1921.15 अंकांनी म्हणजेच 5.32 टक्के वाढला.

- Advertisement -

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) 10746.80 अंकांवर खुला झाला होता. नंतर तो 11381.90 अंकांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. पुढे काहीसा खाली येऊन 11261.05 अंकांवर बंद झाला होता. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये 556.25 अंक म्हणजे 5.20 टक्के वाढ झाली. जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये बाजारात तेजीचा संचार असल्याने बाजारात दिवाळीचा उत्साह दिसून आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -