Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर अर्थजगत Personal Loan घेतायं! मग 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, होईल तुमचाच फायदा

Personal Loan घेतायं! मग ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, होईल तुमचाच फायदा

Related Story

- Advertisement -

पर्सनल लोनवर (Personal Loan) व्याज दर जास्त असल्याने जेव्हा दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नसतो, त्यावेळेसचं पर्सनल लोनचा पर्याय निवडा. अनेकदा पर्सनल लोन आर्थिक अडचणींच्या वेळी किंवा मोठ्या खर्चांची पूर्तता करण्यात मदत करते. परंतु हे Personal Loan घेण्यापूर्वी ग्राहकांनी लोनसंबंधीत सर्व माहितींचे सर्वेक्षण केले पाहिजे. कारण अनेक बँका पर्सनल लोनवर कमी व्याज घेतात त्यामुळे या संधींचा फायदा घेत पर्सनल लोन घेता येऊ शकते. आज आम्ही तुम्हाला वैयक्तिक कर्जाशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, जे तुमच्यासाठी उपयोगी ठरतील.

कर व गुंतवणूक तज्ज्ञ बलवंत जैन यांच्या मते, तुमचे ज्या बँकेत खाते आहे. त्या बँकेतूनच लोन घेणे तुमच्या सोपे जाईल. कारण त्या बँकेकडे तुमच्या एकुणच आर्थिक व्यवहारांची माहिती असते. त्यामुळे लोन प्रोसेस करण्यास कमी वेळ लागतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोन मिळण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे असते. यासाठी तुम्हाला इनकमसंबंधीत कागदपत्रे जसे की फॉर्म नंबर १६, आयटीआरची कॉपी उपलब्ध करावी लागते. ज्यातून तुमची लोन फेडण्याची क्षमता दर्शवली जाते.

ऑफर्स

- Advertisement -

बर्‍याच बँका आणि वित्तीय संस्था Personal loan साठी ऑफर्स देत असतात. या ऑफर्समध्ये पर्सनल लोनसह ग्राहकांना व्याजदरात सूट आणि अनेक सवलती दिल्या जातात. त्यामुळे पर्सनल लोन घेण्यापूर्वी ग्राहकांनी बाजारात उपलब्ध  ऑफर्सची माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच बाजारातील उपलब्ध पर्सनल लोनच्या व्याजदरांची तुलना केली पाहिजे. यातून सर्वात कमी व्याजदरासह लोन देणाऱ्या बँकेचा किंवा वित्तीय संस्थांचा पर्याय निवडला पाहिजे.

क्रेडिट स्कोअर

लोन घेताना क्रेडिट स्कोर खूप महत्वाचा असतो. चांगल्या क्रेडिट स्कोअरमुळे ग्राहकांना सहजपणे कमी व्याजदरात पर्सनल लोन मिळू शकते. ७५० आणि त्यावरील क्रेडिट स्कोअर असल्यास चांगले पर्सनल लोन मिळण्याची शक्यता वाढते. ग्राहक आपला क्रेडिट युटिलाइजेश प्रमाण ३० टक्क्यांवर ठेवून चांगला क्रेडिट स्कोअर राखू शकतात.

विश्वसनीयता

- Advertisement -

पर्सनल लोनमध्ये ग्राहकांची विश्वासार्हता खूप महत्त्वाची असते. ग्राहकाची विश्वासार्हता जितकी जास्त असेल तेवढ्याच सहजतेने त्यांना मनासारखे लोन मिळू शकेल. लोकप्रिय संस्था आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना त्यांच्या पसंतीच्या लोन डिल्स मिळवणे सोपे जाते. याचे कारण असे की, मोठ्या आणि लोकप्रिय कंपन्यांमध्ये काम करणा्या लोकांच्या नोकरीमध्ये अधिक स्थिरता असते, याचा अर्थ असा की, ते कर्मचारी वेळेवर लोन फेडण्यास अधिक सक्षम असतात.

पेमेंट हिस्ट्री

लोन घेताना ग्राहकाचा चांगली पेमेंटची हिस्ट्री त्यांच्यासाठी फायद्याची ठरते. यासाठी ग्राहकांनी क्रेडिट कार्डची बिले पूर्णपणे भरण्याचा प्रयत्न करा आणि घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्याचा प्रयत्न करा. जर ग्राहकाने आधीच कोणते लोन घेतले असेल तर त्याचा ईएमआय नियमितपणे जमा करावा. यामुळे ग्राहकांना नवीन कर्ज घेण्यास अधिक सोपे होईल. त्याचवेळी कमी व्याजदारासह लोन मिळणे सोपे जाईल.


धक्कादायक! नगर अर्बन बँकेत लिलावासाठी ठेवलेलं कोट्यावधीचं सोनं निघालं बनावट

- Advertisement -