घरअर्थजगतTRAI : आता वर्षातला एक मोबाईलचा रिचार्ज कमी होणार, मोबाईल कंपन्यांना ट्रायचा...

TRAI : आता वर्षातला एक मोबाईलचा रिचार्ज कमी होणार, मोबाईल कंपन्यांना ट्रायचा आदेश

Subscribe

मोबाईल ग्राहकांसाठी यंदाच्या वर्षात जानेवारी महिन्यातच चांगली बातमी समोर आली आहे. मोबाईल ग्राहकांना यापुढे वर्षापोटी कमी रिचार्ज करावे लागणार आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (TRAI) समोर असलेल्या एका प्रकरणाच्या निमित्ताने येत्या काळात रिचार्जची संख्या कमी होणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना डेटा आणि मोबाईल टॉकटाईमचा कालावधीही बदलणार आहे. परिणामी ग्राहकांच्या वर्षापोटीचा एक रिचार्ज कमी होणार आहे.

दूरसंचार सेवा क्षेत्रातील कंपन्यांना यापुढच्या काळात आपल्या ग्राहकांसाठी ३० दिवसांच्या कालावधीचे मोबाईल प्रीपेड प्लॅन उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने याबाबतचा आदेश गुरूवारी जाहीर केला. या आदेशामुळे दरवर्षी ग्राहकांकडून केल्या जाणाऱ्या मोबाईल रिचार्जची संख्या कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

- Advertisement -

सद्यस्थितीला टेलिकॉम ऑपरेटर्सकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्लानमध्ये २८ दिवसांच्या कालावधीच्या मोबाईल प्लानचा समावेश आहे. त्यामुळेच ग्राहकाला वर्षापोटी १३ वेळा रिचार्ज करण्याची वेळ येते. ट्रायने दिलेल्या आदेशानुसार आता मोबाईल कंपन्यांना ३० दिवसांचा मोबाईल प्लान उपलब्ध करून द्यावा लागेल. त्यामध्ये डेटा आणि कॉलिंग अशा दोन्ही कॉम्बो सुविधांचा हा ३० दिवसांचा प्लान असेल.

ट्रायच्या या आदेशानुसार आता मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांना असे प्लान द्यावे लागतील, जे महिन्याच्या त्याच तारखेला रिन्यू करता येईल. ट्रायच्या या आदेशाच्या जाहीर झाल्याच्या तारखेपासून मोबाईल कंपन्यांना ६० दिवसांमध्ये या प्लानची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -