घरअर्थजगतJune Rules Change : 1 जून 2022 पासून बदलणार 'हे' 5 नियम;...

June Rules Change : 1 जून 2022 पासून बदलणार ‘हे’ 5 नियम; तुमच्या खिश्यावर होणार परिणाम

Subscribe

1 जूनपासून आणखी बरेच बदल होणार आहेत, त्यामुळे तुमचा खिसा खाली होणार आहे.

जून 2022 महिना बुधवारपासून सुरु होणार आहे.1 जूनपासून देशातील महत्त्वाचे 5 नियम बदलणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. कारण 1 जूनपासून देशात ईएमआय महाग होणार आहे त्यामुळे तुम्हाला वाहनांचा विमा उतरवण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. 1 जूनपासून आणखी बरेच बदल होणार आहेत, त्यामुळे तुमचा खिसा खाली होणार आहे.

1- SBI होम लोन EMI महागणार: 1 जूनपासून देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI मधून होमलोन घेणाऱ्यांचा EMI महाग होणार आहे. त्यामुळे तुम्ही नवीन घर घेण्यासाठी SBI कडून होमलोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक महाग व्याजावर होमलोन मिळेल, ज्यामुळे EMI महाग होईल. SBI ने त्याचा होम लोन-लिंक्ड एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) 40 बेस पॉईंट्सने 7.05 टक्क्यांनी वाढवला आहे, तर रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 6.65 टक्के + CRP असेल. SBI वेबसाइटनुसार, वाढलेले व्याजदर 1 जून 2022 पासून लागू होतील. यापूर्वी एसबीआयचा एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) 6.65 टक्के होता, तर रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 6.25 टक्के होता.

- Advertisement -

2. Third Party Motor Insurance Premium महागणार: जर तुमच्याकडे वाहन असेल तर तुमचा खर्च वाढणार आहे कारण 1 जूनपासून थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्सचा प्रीमियम वाढणार आहे. यासंदर्भात सरकारने अधिसूचना जारी केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या विविध श्रेणींसाठी थर्ड पार्टी मोटर वाहन विम्याच्या प्रीमियममध्ये वाढ केली आहे, जी 1 जूनपासून लागू होईल. त्यामुळे कार आणि दुचाकीचा विमा महागणार आहे. अधिसूचनेतील सुधारित दरानुसार, 1000 सीसी इंजिन क्षमतेच्या खाजगी कारसाठी प्रीमियम आता 2072 रुपयांच्या तुलनेत 2094 रुपये असेल. 1000 ते 1500 सीसी इंजिन असलेल्या खाजगी गाड्यांसाठी आता प्रीमियम 3221 रुपयांऐवजी 3416 रुपये असेल. तथापि, 1500 सीसी वरील खाजगी कारसाठी थर्ड पार्टी विमा प्रीमियममध्ये किरकोळ कपात करण्यात आली आहे आणि ती 7897 रुपयांवरून 7890 रुपयांपर्यंत खाली येईल. त्याचप्रमाणे, 150 ते 350 सीसी पर्यंतच्या दुचाकींसाठी 1366 रुपये प्रीमियम असेल. तर 350 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाकींसाठी हा दर 2804 रुपये असेल.

3. Gold Hallmarking अनिवार्य : 1 जून 2022 पासून दुसऱ्या टप्प्यात आणखी काही जिल्ह्यांमध्ये गोल्ड हॉलमार्किंग लागू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात देशातील 32 नवीन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग सुरू होणार आहे. 1 जूननंतर देशातील एकूण 288 जिल्ह्यांमध्ये 14, 18, 20, 22, 23, 24 कॅरेट सोन्याचे दागिने हॉलमार्किंगसह विकले जातील. पहिला टप्पा भारतीय मानक ब्युरो (BIS) ने 23 जून 2021 पासून देशातील 256 जिल्ह्यांमध्ये अनिवार्य सोन्याचे हॉलमार्किंगसह सुरू केले होते.

- Advertisement -

4. Axis Bank च्या बचत खात्याच्या शुल्कात बदल: अॅक्सिस बँकेने निम-शहरी आणि ग्रामीण भागातील बचत खात्यांसाठी आणि सॅलरी प्रोग्रामअंतर्गत सुरु केलेल्या बँक अकाऊंटसाठी 1 जूनपासून किमान अकाऊंट बॅलेन्स मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Easy Saving आणि सॅलरी प्रोग्राम असलेल्या खात्यांसाठी मिनिमम अकाऊंट बॅलेन्स 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आली आहे. तर 1 लाख रुपयांचा टर्म डिपॉझिट ठेवणे आवश्यक असेल. त्याच वेळी लिबर्टी सेव्हिंग अकाऊंटमधील मिनिमम अकाऊंट बॅलेन्स 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आली आहे. किंवा 25,000 रुपये खर्च करावे लागतील.

5. India Post Payment Bank: इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ने म्हटले आहे की, आता आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टमसाठी Issuer Charge भरावे लागेल. नियमांनुसार, दर महिन्याला पहिले तीन AEPS व्यवहार विनामूल्य असतील, ज्यात AEPS रोख पैसे काढणे, AEPS रोख ठेव आणि AEPS मिनी स्टेटमेंट समाविष्ट आहे. विनामूल्य व्यवहारांनंतर प्रत्येक रोख पैसे काढणे किंवा रोख ठेवीवर 20 रुपये अधिक GST स्वतंत्रपणे लागू होईल, तर मिनी स्टेटमेंट व्यवहारावर 5 रुपये अधिक GST लागू होईल.


7th Pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर! DA मध्ये होणार 13 टक्क्यांची वाढ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -