घरअर्थजगतआता कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार, आरबीआय गव्हर्नरांची मोठी घोषणा

आता कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार, आरबीआय गव्हर्नरांची मोठी घोषणा

Subscribe

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, आता डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा सर्व बँकांमध्ये दिली जाणार आहे. आतापर्यंत फक्त काही बँकांमध्ये कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा होती. UPI च्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येतात, अशीही माहिती त्यांनी दिली.

नवी दिल्ली : तुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता एटीएम कार्डशिवायही पैसे काढता येणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केलीय. आतापर्यंत ही सुविधा काही बँकांमध्येच उपलब्ध होती. पण आता ही सुविधा तुम्हालाही वापरता येणार आहे.

कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढले जातील

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, आता डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा सर्व बँकांमध्ये दिली जाणार आहे. आतापर्यंत फक्त काही बँकांमध्ये कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा होती. UPI च्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येतात, अशीही माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

कार्ड क्लोनने फसवणूक कमी होणार

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या मते, या पावलामुळे कार्ड क्लोन करून पैसे काढण्याची फसवणूकही कमी होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी चलनविषयक धोरण जाहीर केले.

रेपो दरात कोणताही बदल नाही

एमपीसीने पॉलिसी दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 4 टक्क्यांवर कायम आहे. केंद्रीय बँकेने व्याजदरात बदल न करण्याची ही सलग 11वी वेळ आहे. यापूर्वी, रिझर्व्ह बँकेने 22 मे 2020 रोजी रेपो दरात शेवटचा बदल केला होता. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2022 -23 मधील आपले पतधोरण जाहीर केलं आहे. या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात अपेक्षेनुसार कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज रेपो दरात कोणताही बदल होणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे रेपो दर पूर्वीप्रमाणेच 4 टक्क्यांवर कायम राहील. त्याचवेळी रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्क्यांवर कायम आहे. ही सलग 11 वी बैठक आहे ज्यामध्ये RBI च्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.

- Advertisement -

हेही वाचाः RBI Monetary Policy : रिझर्व्ह बँकेचे रेपो दर जैसे थेच; कोणताही बदल नाही

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -