देशात 1997 नव्या कोरोनाबाधितांचे निदान, 3,908 रुग्णांची मात

CORONA

नवी दिल्ली : देशामध्ये गेल्या 24 तासांत 1 हजार 997 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.94 टक्का आहे. तर, या 24 तासांत 3 हजार 908 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर, नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील कोविड-सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 30 हजार 362 इतकी असून ही आकडेवारी एकूण रुग्णसंख्येच्या 0.09 टक्का आहे. गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 908 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. त्यानुसार एकूण कोविडमुक्त झालेल्यांची संख्या 4 कोटी 40 लाख 47 हजार 344 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 98.75 टक्के इतका आहे.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.94 टक्का असून साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.34 टक्के इतका आहे. आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 89 कोटी 64 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत; गेल्या 24 तासांत 2 लाख 13 हजार 123 चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासांत नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 28 हजार 754 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

218.88 कोटी लसीकरण
देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 218.88 (2,18,88,17,589) कोटींची संख्या ओलांडली आहे.देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारी 2021पासून सुरूवात झाली. तर, 21 जून 2021 पासून या लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा टप्पा सुरू झाला.