घरCORONA UPDATEठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ८१८ रुग्ण आढळले; ६ रुग्ण दगावले  

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ८१८ रुग्ण आढळले; ६ रुग्ण दगावले  

Subscribe

जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची २ लाख ६७ हजार ९१०

जिल्ह्यात मंगळवार पेक्षा बुधवारी जवळपास २०० ने कोरोना बाधितांची वाढली आहे. बुधवारी कोरोनाचे ८१८ रुग्ण  आढळून आले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची २ लाख ६७ हजार ९१० इतकी नोंदवण्यात आली आहे. तर, जिल्ह्यातील मृतांची संख्या ६ हजार २८६ झाली आहे.

ठाणे शहर परिसरात २३५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६२ हजार ८८८ झाली आहे. शहरात एकाच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूची संख्या १ हजार ३९० झाली आहे. कल्याण – डोंबिवलीत २४२ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत १५३ रुग्णांची वाढ झाली असून मृत्यूसंख्या दोन आहे. उल्हासनगरमध्ये २४ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू झाला नाही. भिवंडीत २ बाधीत असून एकही मृत्यूची नोंद नाही.  मीरा भाईंदरमध्ये ६९ रुग्ण आढळले  आहे. अंबरनाथमध्ये २२ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. बदलापूरमध्ये ३९ रुग्णांची नोंद झाली असून एकाही मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये ३२ रुग्णांची वाढ झाली असून २ मृत्यू जाले आहेत. आता बाधीत १९ हजार ६२७ आणि आतापर्यंत ५९५ मृत्यू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -