घरCORONA UPDATEकोरोनानंतर होणाऱ्या आजारांसाठी 'अ‍ॅक्युपंक्चर थेरपी' ठरतेय गुणकारी

कोरोनानंतर होणाऱ्या आजारांसाठी ‘अ‍ॅक्युपंक्चर थेरपी’ ठरतेय गुणकारी

Subscribe

आपण कधी ना कधी अ‍ॅक्युपंक्चर आणि अ‍ॅक्युप्रेशर (Acupressure & Acupuncture) या उपचार पद्धती ऐकल्या असतील. अनेक आजारांवर या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. जगभरात ६ हजार वर्षापासून विविध आजारांवर ही पद्धत फॉलो केली जाते. मात्र भारतात अलीकडेच तिचा वापर वाढत आहे. ऍक्युप्रेशर किंवा अ‍ॅक्युपंचर या चीनी चिकित्सा पद्धती (Chinese Medical Practices) आहेत. या उपचारांचा परिणाम होण्यास वेळ लागत असला तरी त्याचे साईड इफेक्ट (No Side Effect)होत नाहीत. यातील अ‍ॅक्युपंक्चर ही उपचार पद्धती आता कोरोना रुग्णांसाठीही प्रभावी ठरत आहे. त्यामुळे कोरोनामुळे गंभीर इजा झालेल्या फुफ्फुसांनाही पुन्हा जिवंत करण्यासाठी अ‍ॅक्युपंक्चर उपचार पद्धती प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. गंगाराम रुग्णालयाच्या अ‍ॅक्युपंक्चर विभागाचे अध्यक्ष आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. रमन कपूर यांनी कोरोनानंतर फुफ्फुसांसंबंधीत गंभीर आजारांच सामना करणाऱ्या ३५ रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याचा दावा केला आहे.

शरीरातील हीच ऊर्जा वाढण्यासाठी अ‍ॅक्युपंक्चर पॉईंट्स

अ‍ॅक्युपंक्चर उपचार पद्धतीने सुमारे ७० टक्के रुग्णांचे फुफ्फुसांचे कार्य पुन्हा सुधारले आहे. त्यामुळे रुग्णांची नेब्युलायझर्स आणि अॅलोपॅथीची इतर औषधे पुर्णपणे बंद झाली आहेत. बऱ्याच कोरोनामुक्त रुग्णांना थकवा जाणवतो. कारण कोरोना विषाणूच्या शरीरभर झालेल्या संसर्गामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते. शरीरातील हीच ऊर्जा वाढण्यासाठी अ‍ॅक्युपंक्चर पॉईंट्स असतात. या एनर्जी पॉईंटवर अगदी बारीक सुईने पंक्चर म्हणजे छेद केला जातो. यामुळे त्याला अ‍ॅक्युपंक्चर म्हटलं जातं. अ‍ॅक्युपंक्चरला मेडिकल सायन्समध्ये देखील महत्त्व आहे. WHOने अ‍ॅक्युपंक्चर थेरपीला मान्यता दिलेली आहे.

- Advertisement -

२ ते ३ महिन्यात ७० टक्के रुग्ण बरे

या पॉईंट्सवर योग्यपद्धतीने सुईं टोचून उपचार केल्याने शरीरातील ऊर्जा वाढते. या पद्धतीने १० ते १५ वेळा उपचार केल्यास शरीरातील थकवा पूर्णंता कमी होतोय. व्यतिरिक्त कोरोनाचे अधिक रूग्ण हे कोरडे खोकला, सांधेदुखी, नैराश्यामुळे झोपेची समस्या, पोटाचे आजार आणि फुफ्फुसाच्या बिघाडामुळे श्वासोच्छवासाच्या समस्येने ग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. मात्र डॉक्टर रमन यांनी आत्तापर्यंत जवळपास १०० हून अधिक अशा रुग्णांवर उपचार केले आहेत. यातील ३५ रुग्णांना फुफ्फुसासंबंधीत आजार होते. त्यांचे फुफ्फुसांचे कार्य फक्त ३० ते ४० टक्केच ठीक होते. मात्र अ‍ॅक्युपंक्चर उपचार पद्धतीमुळे २ ते ३ महिन्यात ७० टक्के रुग्ण बरे झाले आहेत.

आता रुग्णाला सुई टोचण्याचीही गरज लागत नाही

आपल्या शरीरात ८०० अ‍ॅक्युपंक्चर पॉईंट्स असतात. जिथे सुई टोचून उपचार केले जातात. मात्र आता असे तंत्र विकसित झाले आहे की ज्यामुळे रुग्णाला सुई टोचण्याचीही गरज लागत नाही. आता अ‍ॅक्युपंक्चर पॉईंट्सवर लेसर आणि कलर थेरपीचा वापर करत उपचार केला जात आहेत. त्यामुळे अ‍ॅक्युपंक्चर उपचार पद्धतीचे फायदे असणारे बहुतेक रूग्ण ही उपचार पद्धती फॉलो करतात. अ‍ॅक्युपंक्चर उपचारांमुळे मेंदूला व्यवस्थितरित्या रक्त पुरवठा होते. ज्यामुळे मेंदूमधून पुरेसे प्रमाणात बायोकेमिकल संप्रेषण होते. यामुळे झोपेची समस्या दूर होते.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -