घरCORONA UPDATEApple ने इस्त्राइलच्या NSO Group विरोधात दाखल केला खटला, iPhone यूजर्सच्या हेरगिरीचा...

Apple ने इस्त्राइलच्या NSO Group विरोधात दाखल केला खटला, iPhone यूजर्सच्या हेरगिरीचा आरोप

Subscribe

Apple Sues NSO Group: टेक्नोलॉजी क्षेत्रातील सर्वात मोठ्या अॅपल कंपनीने इस्त्राइलच्या NSO Group विरोधात खटला दाखल केला आहे. iPhone यूजर्सच्या खासगी माहितीची पेगाससच्या माध्यामातून हेरगिरी करत असल्याचे आरोप करत Apple कंपनीने कॅलिफोर्नियातील फेडरल कोर्टात खटला दाखल केला आहे. Apple कंपनीने या याचिकेत म्हटले की, एनएसओ ग्रुपकडून अत्याधुनिक सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने iPhone युजर्सच्या माहितीचा दुरुपयोग केला जातोय. त्यामुळे NSO Group वर बंदी आणावी अशी मागणी Apple कंपनीने केलीय.

Apple कंपनीची तक्रार काय?

यासोबतच अॅपल कंपनीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अॅपलच्या ग्राहकांना एनएसओ ग्रुपकडून स्पायवेअर पेगाससच्या माध्यमातून लक्ष्य केले जातेय. NSO ग्रुपकडून स्पायवेअर पेगाससचा वापर करुन जगभरातील अॅपल ग्राहकांच्या खासगी माहितीवर हल्ला केला जातोय. त्यामुळे अॅपल कंपनीच्या सॉफ्टवेअर, सर्विस आणि डिव्हाईसचा अनधिकृतरित्या होणारा वापर थांबवावा यासाठी एनएसओ ग्रुपवर बंदी आणावी. या ग्रुपने पेगाससच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळपास १.६५ बिलियन यूजर्सच्या माहिती हेरगिरी केली, यात तब्बल १ बिलियनहून अधिक आयफोन यूजर्सचा समावेश आहे. अॅपल कंपनीने पुढे म्हटले की, कंपनीचे डिव्हाईस सुरक्षित आहे, मात्र प्रायव्हेट कंपन्या असे काही टूल तयार करत आहेत ज्यामुळे धोका निर्माण झाला आहे.

- Advertisement -

मात्र एनएसओ ग्रुपने सर्व आरोप नाकारले आहे. एनएसओ ग्रुपने स्पष्टीकरण देत सांगितले की, त्यांचे सॉफ्टवेअर दहशतवाद आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकार वापरतात. मात्र या ग्रपुने अॅपल कंपनीने दाखल केलेल्या खटल्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान एनएसओ ग्रुपवर दिग्गज सोशल मीडिया कंपनी फेसबुक (कंपनीचे नाव मेटा आहे) द्वारे देखील खटला दाखल केला जाणार आहे. याशिवाय नुकतेच अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने एनएसओ ग्रुपला काळ्या यादीत टाकले होते. यानंतर आता अॅपलची ही कारवाई एनएसओ ग्रुपसाठी मोठा धक्का मानला जातोय.

- Advertisement -

एनएसओ वादग्रस्त कंपनी

काही दिवसांपूर्वी, सुरक्षा संशोधकांना असे आढळून आले की, पेगाससचा वापर जगभरातील मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार आणि अगदी कॅथोलिक धर्मगुरूंचे फोन टॅपिंग करण्यासाठी केला जात आहे. पेगासस हे एनएसओ ग्रुपचे स्पायवेअर आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -