घरCORONA UPDATEमुंबईत कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी पालिका लाखो लसीचे डोस करणार आयात

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी पालिका लाखो लसीचे डोस करणार आयात

Subscribe

मुंबई सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देणे शक्य होत नाही.

राज्यात ठिकठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. परंतु कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेला यश मिळत आहे. मात्र देशात आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे भारतातील मोठे आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईतही संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेता लाखो लसीचे डोस आयात करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याबाबत मुंबईचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी आज एका मुलाखतीत बोलताना सांगितले की, जागतिक उत्पादकांकडून निविदा मागविण्यासाठी परवानगी घेण्यासाठी महापालिका राज्य सरकारशी चर्चा करीत आहे.

यावर बोलताना चहल म्हणाले की. लसीचा डोस संदर्भात राज्य सरकारची निविदा ४० लाख पेक्षा अधिक असू शकते त्यामुळे ही संख्या कोणत्याही एका परदेशी पुरवठादाराला देणे शक्य होणार नाही, त्यामुळे आम्ही दोन ते तीन परदेशी कंपन्यांकडून ५ लाख लसीचे डोस घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत यावर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल असेही चहल म्हणाले.

- Advertisement -

तसेच मुंबईत केंद्राने मंजुर केलेल्या कोणत्याही लसीला परवानगी दिली जाणार आहे. मग ती रशियाचे स्पुतनिक असो, मॉडर्ना इंक आणि जॉन्सन अँड जॉन्सनची असो किंवा फाइजरची लस असो. दरम्यान या लसींना सुरक्षित आणि योग्य वातावरणात ठेवण्यासाठी मुंबई या कंपन्यांना जादा पैसे देण्यास तयार आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत शहर असणारी मुंबई कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेतही मुख्य हॉटस्पॉट ठरली होती. परंतु पालिका तेव्हापासून विषाणूला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान पालिकेने आता सर्वाधिक मुंबईकरांना लस देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे खासगी कंपन्या आणि गृहनिर्माण संस्थांना आपल्या आवारात मान्यता प्राप्त रुग्णालयाच्या देखरेखीखाली लसीकरण शिबीर घेण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु मुंबईत सध्या कोरोना लसीची कमतरता निर्माण झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

- Advertisement -

कोणत्याही १३९ खासगी रुग्णालये प्रत्येकी दोन नर्स, एका डॉक्टर आणि एक रुग्णवाहिका अशी आरोग्य यंत्रणा तयार करत कोणत्याही कार्यालये किंवा गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये दोन तासांत लसीकरण मोहिम पूर्ण करु शकतात. असेही चहल म्हणाले. परंतु मुंबईला गेल्या १५ दिवसांत भारत बायोटेक लिमिटेडच्या कोवॅक्सिन लसीचा एकही डोस मिळालेला नाही तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हिशील्ड लसीचे ५० हजार पेक्षा कमी डोस मिळाले आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रा उघल्यानंतर लगेचचं सर्व लसी बुक होत आहेत. त्यामुळे मुंबई सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देणे शक्य होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने मुंबईला १५ लाख लसी दिल्यानंतर लसीकरण मोहिम पुन्हा सुरु होईल.असेही चहल म्हणाले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -