Corona : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ठाणे जिल्हा दौऱ्यावर

उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, सोमवारी ठाणे जिल्ह्यात कोरोना संबंधीत आढावा घेण्यासाठी दौरा करणार असून यावेळी ते ठाणे, नवी मुंबई तसेच कल्याण – डोंबिवली या महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेणार आहेत. ठाण्यातील बैठक दुपारी ०३.३० वाजता पार पडणार असून नवी मुंबईतील बैठक सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे. तर कल्याण – डोंबिवलीतील बैठक ही सायंकाळी साडेसहा वाजता पार पडणार आहे. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णवाहीनीचे लोकार्पण देखील केले जाणार आहे.

 

हेही वाचा –

बापरे! समोस्यामध्ये सापडली साबणाची वडी, डॉक्टरांच्या कँटीनमधील घटना