ठाकरे सरकारमधील अजून एक मंत्री कोरोना बाधित, एकनाथ शिंदेंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!

bring thane and mmr region development projects on fast track
ठाणे व एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर

राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली असून ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री त्यामुळो कोरोनाबाधित झाला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती…

कोरोना संकटकाळातही एकनाथ शिंदे सतत फिरतीवर असल्याचे पाहायला मिळत होते. त्यांनी वेळोवेळी आढावा बैठका, हॉस्पिटलमधील दौरे केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख यांना करोनाची लागण झाली होती. त्यातून बरे होऊन हे तिन्ही मंत्री पुन्हा कामाला लागले आहेत. तर, एकनाथ शिंदे यांनाही करोनाची लक्षणं जाणवल्यानंतर कोरोनाची चाचणी केली त्यानंतर एका दिवसात या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती ठिक असून गेल्या काही दिवसांत त्यांच्या सपंर्कात आलेल्या व्यक्तींनी करोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा –

‘मुंबईचं काय होणार,देवचं जाणे’; भिवंडी दुर्घटनेवरुन कंगनाचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा