घरCORONA UPDATEकोरोनाचा विषाणू युरोपप्रमाणे वेगाने पसरतोय

कोरोनाचा विषाणू युरोपप्रमाणे वेगाने पसरतोय

Subscribe

रोग्य तज्ज्ञांच्या मते प्रकरणे फार गंभीर नाहीत

देशात विशेषत: महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असताना त्यात अजून एका गंभीर गोष्टीची भर पडली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते कोरोनाची प्रकरणे फार गंभीर नाहीत; पण कोरोना विषाणू आता युरोपप्रमाणे वेगाने पसरत असून ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशभर थैमान घातले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे आहेत. महाराष्ट्राची परिस्थिती तर खूपच गंभीर आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा महाराष्ट्रात कोरोनाचे तितकेच रुग्ण समोर येत आहेत. कोरोनाची दुसरी लाट येत्या काळात काय काय करू शकते, याचा अंदाज आरोग्य तज्ज्ञांना येत नाही आहे. देशातील एकूण कोरोना प्रकरणांपैकी 90 टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्रात आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची ही प्रकरणे फार गंभीर नाहीत; पण कोरोना विषाणू आता युरोपप्रमाणे वेगाने पसरतो आहे. मुंबईतल्या महापालिका रुग्णालयांनी फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात कोविड वॉर्डमधील बेडची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता परिस्थिती पुन्हा बिघडते आहे. सध्या मुंबईतील रुग्णालयांतील सर्व कोविड वॉर्ड भरले आहेच.

- Advertisement -

राज्याच्या आरोग्य विभागातील साथीच्या रोगाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट सध्या जास्त घातक नाही. पण यावेळी व्हायरस युरोपसारखा तेजीने पसरत आहे. महाराष्ट्रात 15 ते 21 फेब्रुवारीपर्यंत मृत्यू दर 0.7 टक्के होता. जो 15 ते 20 मार्च या कालावधीत 0.32 टक्के झाला आहे. 15 फेब्रुवारीपासून आतापर्यंत कोरोना केसेस चौपट झाल्या आहेत तर आठवड्याची प्रकरणे तिपटीने वाढली आहेत. महापालिकेचे डॉक्टर प्रिन्स सुराना यांनी सांगितले की, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही चेंबूरमधील रुग्णालयातील बेडची संख्या कमी करण्याचा विचार करत होतो. पण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व बेड फूल झाले. आमचे 9 व्हेंटिलेटरदेखील फुल आहेत.

मुंबईत हॉटस्पॉटवर महापालिकेची नजर

मुंबईतील हॉटस्पॉटवर महापालिकेची करडी नजर आहे. बोरिवली, अंधेरी, कांदिवली, मुलुंड या परिसरात एक हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कुलाबा, सँडहर्स्ट रोड, काळबादेवी, भुलेश्वर परिसरात सर्वात कमी रुग्ण आहेत. धारावीत वाढणार्‍या रुग्णांची संख्या महापालिकेसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या विभागांकडे पालिकेने विशेष लक्ष दिले असून, रुग्णांचा शोध, तपासण्या, चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. डिसेंबर, जानेवारीपर्यंत आटोक्यात आलेल्या कोरोनाने फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागासमोर आव्हान उभे राहिले आहे. मुंबईतील ९० टक्क्यांहून रुग्ण हे इमारती आणि उच्चभ्रू वस्तीमधील असल्याचे पालिकेच्या पाहणीत समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -