घरCORONA UPDATEभारत करणार संयुक्त राष्ट्र शांतीसेनाला कोविड-१९च्या लसींचा पुरवठा

भारत करणार संयुक्त राष्ट्र शांतीसेनाला कोविड-१९च्या लसींचा पुरवठा

Subscribe

महामारीतून बाहेर यायचे असेल तर, देशांमध्ये वैश्विक समन्वय साधणे गरजेचे आहे.

भारताने संयुक्त राष्ट्र शांतीसेनाला कोविड-१९च्या दोन लाख लसींचा पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. परराष्ट्रमंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांनी सुरक्षा परिषदच्या चर्चेवेळी ही घोषणा केली. शांतिरक्षक हे त्यांच काम जोखीम स्विकारुन करत असतात. त्यांनाही या महामारीचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. जगात कुठेही अशांतता आणि अस्थिरता निर्माण झाली, संबंधित देशांना परिस्थिती आटोक्यात आणता येत नसेल तर, ‘यू एन’ (संयुक्त राष्ट्र संघटना) सुरक्षा परिषदेत ठराव करुन त्या देशात शांतीसेना पाठवते. त्यामुळे त्यांना दोन लाख लसींचा पुरवठा करण्यात येणार आहे.

सुब्रह्मण्यम जयशंकर यांनी घोषणा केल्यानंतर भगवतगीतेचा संदर्भ दिला आहे. नेहमी दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे. हीच भावना मनात ठेऊन कोविड-१९ च्या महामारीशी भारत दोन हात करीत आहे. यावर संयुक्त राष्ट्रमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी एस तिरुमूर्ति यांनी ट्वीट केले आहे.

- Advertisement -

वैश्विक लढाईमध्ये जगाचे औषधालय

जयशंकर यांनी परिषदेत सांगितले की, जगाचे औषधालय म्हणजे भारत कोविड-१९ च्या वैश्विक लढाईमध्ये नेहमीच
अग्रणी आहे. याअगोदरही भारताने १५० पेक्षा जास्त देशांना औषधे, वेंटिलेटर, पीपीई कीट अशा अनेक गोष्टींची मदत केली. जगाचे हेच औषधालय वैश्विक पातळीवर लसींचे आव्हान सोडवण्यास मदर करीत आहे. जगातील पंचवीस राष्ट्रांना भारताने लस प्राप्त केली आहे आणि येत्या काही दिवसांत अनेक देशांना लसींची पूर्तता केली जाईल, ज्यात युरोप, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन ते आफ्रिका, दक्षिण-पूर्व आशिया आणि पॅसिफिक बेटांचा समावेश आहे.

- Advertisement -

महामारीतून बाहेर यायचे असेल तर, आरोग्यासाठी सामूहिक जबाबदारी घ्यावी लागेल. जानेवारीमध्ये संयुक्त राष्ट्र महासचिव एंटानियो गुतरेस यांनी सांगितले की, वैश्विक समन्वयाच्या अभावी कोरोना महामारीचे संकट अजूनच ओढवत आहे. कारण अनेक देशांनी त्या त्या देशात बनवले गेलेले व्हॅक्सीन आयात-निर्यात करण्यास नकार दिला होता. त्यामुळे देशांमध्ये वैश्विक समन्वय साधणे गरजेचे आहे.


हेही वाचा – मुंबईकरांची होतेय ‘लोकल’ भूल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -