घरCORONA UPDATEतबलिगी जमातियांच्या सर्च ऑपरेशनदरम्यान पोलिसांवर दगडफेक

तबलिगी जमातियांच्या सर्च ऑपरेशनदरम्यान पोलिसांवर दगडफेक

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असताना दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीचा मेळावा घेण्यात आला. या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून मेळाव्यातून घरी परतलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. यादरम्यान अहमदाबाद येथे पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे.

मेळाव्यातून परतलेल्या लोकांचा महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, दिल्लीपासून कश्मीर, नेपाळपर्यंत शोध घेण्यात येत आहे. यात अहमदाबाद येथे मेळाव्यातून परतेल्या लोकांचा शोध घेण्यात येत असताना गोमतीपूर भागात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांना आपल्या वस्तीत आलेल बघून येथील कसाई चाळीतील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्या वर उतरले व त्यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. अशीच काही तणावाची परिस्थिती उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व दिल्लीतही निर्माण झाली आहे.

- Advertisement -

आतापर्ंयत या मेळाव्यातून २ हजाराहून अधिक लोकं आपआपल्या गावाकडे निघाले आहेत. तर मेळाव्याच्या ठिकाणाहून ज्यांना बाहेर काढण्यात आले त्यापैकी ६१७ जणांना रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. तर इतरांना क्वारनटाईन करण्यात आले आहे. तसेच इतरांचा शोध घेण्यात येत आहे. गृहमंत्रालयानेही तबलीगी जमातीच्या मेळाव्याशी संबंधित परदेशी नागरिक ज्यांचा रिोपर्ट निगेटीव्ह आला आहे त्यांना परत पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -