घरCORONA UPDATEदेशात 2000हून कमी कोरोना रुग्ण, 133 दिवसांनंतर आढळले सर्वात कमी बाधित

देशात 2000हून कमी कोरोना रुग्ण, 133 दिवसांनंतर आढळले सर्वात कमी बाधित

Subscribe

नवी दिल्ली : कोरोनाच्या बाबतीत एक दिलासादायक चित्र आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 हजार 968 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत देशातील एकूण रुग्णांची संख्या संख्या 4 कोटी 45 लाख 99 हजार 466 झाली आहे.

- Advertisement -

तब्बल 133 दिवसांनंतर दैनंदिन कोरोनाची प्रकरणे दोन हजारांच्या खाली गेल्याचे पाहायला मिळले आहे. तर सोमवारी 3 हजार 11 कोरोना बाधित आढळले होते. यापूर्वी 23 मे रोजी 24 तासांत 1 हजार 675 नवीन रुग्ण आढळले होते. याशिवाय, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्येही घट झाली आहे. सोमवारपर्यंत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 36 हजार 126 होती, ती मंगळवारी 34 हजार 598वर आली आहे. ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.08 टक्का आहे.

गेल्या 24 तासात एकूण 2 लाख 9 हजार 801 कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 89.59 (89,59,58,696) कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत. देशात कोरोना संसर्गामुळे 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे ही संख्या 5 लाख 28 हजार 716 झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 1 हजार 528ने घट झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के झाला आहे. दैनिक पॉझिटिव्हिटी दर 0.94 टक्का आहे तर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.29 टक्के आहे.

- Advertisement -

लसीकरणाने 218.80 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला
मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 218.80 (2,18,80,50,600) कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यात 94.87 कोटी दुसरी मात्रा आणि 21.43 कोटी वर्धक मात्रांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 3 लाख 44 हजार 525 मात्रा देण्यात आल्या

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.10 (4,10,44,847) कोटीपेक्षा जास्त बालकांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, देशातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरू करण्यात आले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -