घरCORONA UPDATECoronavirus in Maharashtra: कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडे तेरा लाखांवर, रिकव्हरी रेटही वाढला

Coronavirus in Maharashtra: कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडे तेरा लाखांवर, रिकव्हरी रेटही वाढला

Subscribe

राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.६५ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडे तेरा लाखांवर गेली असून राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन १ लाख ८५ हजार २७० एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
तर आज राज्यात १० हजार २५९ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज राज्यात २५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णवाढिचा उतरता क्रम दिसत आहे. लोकांमध्ये जागृती तर वाढली आहेच, त्याशिवाय सरकारी पातळीवर देखील चांगले प्रयत्न सुरु आहेत. राज्यात अनलॉक ५ सुरु असला तरी राज्य आता पुर्णपणे नॉर्मलसाठी तयार असल्याचे चित्र आकडेवारीवरुन तरी सध्या दिसत आहे.

- Advertisement -

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८० लाख ६९ हजार १०० नमुन्यांपैकी १५ लाख ८६ हजार ३२१ नमुने पॉझिटिव्ह ( १९.६६ टक्के) आले आहेत. राज्यात २३ लाख ९५ हजार ५५२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २३ हजार ७४९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे.

आज नोंद झालेल्या एकूण २५० मृत्यूंपैकी १५२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५१ मृत्यू पुणे -११, नागपूर -१०, सांगली -७, सोलापूर -५, कोल्हापूर -४, बीड -२, पालघर -२, वाशिम -२, औरंगाबाद -१, भंडारा -१, हिंगोली -१, नाशिक -१, सातारा -१, वर्धा -१, यवतमाळ -१ आणि ठाणे -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. आज करण्यात आलेल्या राज्यातील मृत्यूंच्या रिकॉन्सिलिएशनमुळे प्रगतीपर मृत्यूंच्या संख्येमधे २१३ ने वाढ झाली आहे. सदरील बदल हे संबंधित जिल्हे व महानगरपालिकांच्या प्रगतीपर आकडेवारीमध्ये दर्शविण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -