घरCORONA UPDATEदेशात गेल्या 24 तासांत 5,108 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 5,675 रुग्ण कोविडमुक्त

देशात गेल्या 24 तासांत 5,108 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 5,675 रुग्ण कोविडमुक्त

Subscribe

नवी दिल्ली : देशामध्ये गेल्या 24 तासांत 5 हजार 108 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.44 टक्के इतका आहे. तर, या 24 तासांत 5 हजार 675 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

भारतातील कोविड-सक्रीय रुग्णांची संख्या सध्या 45 हजार 749 इतकी असून ही आकडेवारी एकूण रुग्णसंख्येच्या 0.1 टक्का आहे. गेल्या 24 तासांमध्ये 5 हजार 675 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. त्यानुसार एकूण कोविडमुक्त झालेल्यांची संख्या 4 कोटी 39 लाख 36 हजार 92 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 98.71 टक्के इतका आहे.

- Advertisement -

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.44 टक्के इतका असून साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.70 टक्के इतका आहे. आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 89 कोटी 02 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत; गेल्या 24 तासांत 3 लाख 55 हजार 231 चाचण्या करण्यात आल्या.

- Advertisement -

हेही वाचा – प्रकल्प महाराष्ट्रातून निसटला कसा?, फॉक्सकॉन- वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज ठाकरेंचा संतप्त सवाल

आतापर्यंत 215 कोटी लसीकरण
देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारी 2021पासून सुरूवात झाली. तर, 21 जून 2021 पासून या लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा सुरू झाला. राष्ट्रव्यापी कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या एकूण 215 कोटी 67 लाख मात्रा (94.57 कोटी दुसऱ्या मात्रा आणि 18.70 कोटी वर्धक मात्रा यांच्यासह) देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 19,25,881 मात्रा देण्यात आल्या. देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4 कोटी 6 लाखांहून अधिक (4,06,90,829) किशोरवयीन मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या या नव्या टप्प्यात, देशातील लस निर्मात्यांनी उत्पादित केलेल्या लसीच्या एकूण साठ्यापैकी 75 टक्के साठ्याची खरेदी करून केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्या लसीच्या साठ्याचा (मोफत) पुरवठा करत आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 202 कोटी 52 लाखांहून अधिक (2,02,52,52,325) लसी विनामूल्य आणि थेट राज्य अधिग्रहण श्रेणीच्या माध्यमातून पुरवल्या आहेत. 3 कोटी 98 लाख (3,98,91,440) लसमात्रा अजूनही शिल्लक आहेत.

हेही वाचा – अहमदाबादमध्ये लिफ्ट कोसळून भीषण अपघात, 7 कामगारांचा मृत्यू

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -