घरCORONA UPDATEमुंबईतील बड्या सोसायट्यांमध्ये सुरुयं बनावट लसीकरण, पुरवठादारास उत्तरप्रदेशातून अटक

मुंबईतील बड्या सोसायट्यांमध्ये सुरुयं बनावट लसीकरण, पुरवठादारास उत्तरप्रदेशातून अटक

Subscribe

मुंबई एकीकडे लसीकरण मोहिम वेगाने सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच दुसरीकडे मात्र बनावट लसीकरणाची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे मुंबईतील अनेक बड्या हाऊसिंग सोसायट्यांध्ये बनावट लसीकरण मोहिमेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. य़ातच मुंबईतील मॅचबॉक्स पिक्चर्स कंपनीने लसीकरणाच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना बनावट लस देऊन फसवणुक केल्याप्रकरणी लेखी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मुंबईच्या वर्सोवा आणि कांदिवली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.

हाऊसिंग सोसायटीतील कंपनीनेच केला घोटाळा?

मॅचबॉक्स पिक्चर्सच्या तक्रारीनुसार, कंपनीतील जवळपास १५० कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना २० मे रोजी कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस दिला. परंतु ही लस त्याच लोकांद्वारे देण्यात आली ज्यांचे हाउसिंग सोसायट्यांमधील बनावट लसीकरण मोहिमेत नाव होते. या शिबिराचे आयोजन रुग्णालयाचे माजी कर्मचारी राजेश पांडे, त्याचा साथीदार संजय गुप्ता आणि अनेकांनी केले होते. संजय गुप्ता हे एसपी इव्हेट्स या इव्हेंटमॅनेजमेंट कंपनीत काम करतात. लसीकरणाच्या या बनावट अभियानात ते लोकांना एकत्र गोळा करत आहेत.

- Advertisement -

मॅचबॉक्स कंपनीतील कर्मचाऱ्यांचे काम म्हणणे आहे?

मॅचबॉक्स पिक्चर्समधील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, लस घेऊनही त्यांना लसीकरणानंतरचे प्रमाणपत्र देण्यात आले नाही. यावर कंपनीने म्हणणे आहे की, बॅकलॉगच्या अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास एक आठवड्याचा वेळ लागला. तसेच लसीकरणानंतर एकाही कर्मचाऱ्याला लक्षणे आढळली नाहीत म्हणून आम्ही सध्या चिंतेत आहोत.

हाउसिंग सोसायट्यांमध्ये झालेल्या लसीकरण घोटाळ्यात चार जणांना अटक

हाउसिंग सोसायट्यांमध्ये झालेल्या लसीकरण घोटाळ्यात आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. परंतु कोरोना संकटात मुंबईत एका सोसायटीतील लसीकरण घोटाळ्याने साऱ्यांना चकित केले आहे. यावर सोसायटीतील नागरिकांचे म्हणणे आहे की, या आरोपींनी शिबीराचे आयोजन करत बनावट लस नागरिकांना टोचली.ज्यामुळे आता गोंधळ उडाला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदविला असून आतापर्यंत एकूण चार जणांना अटक करण्यात केली आहे. मुंबई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत मध्य प्रदेशातील सतना येथून एका व्यक्तीला पकडले आहे. त्याच्यावर बनावट लस पुरविल्याचा आरोप आहे. बनावट लसीकरणाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हा मुंबईहून पळून मध्यप्रदेशात पोहचला.

- Advertisement -

आरे कॉलनीत मोठी चोरी, ‘सावधान इंडिया’ फेम दोन अभिनेत्रींना अटक


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -